ETV Bharat / state

KCR In Marathwada : म्हणून केसीआर देत आहेत मराठवाड्याकडे लक्ष! - kcr rally in Maharashtra

महाराष्ट्रातील मोठी शहेर सोडून बीआरएस मराठवाड्यात दाखल होऊ पाहतो आहे. त्यामुळे त्यांनी हाच भाग का निवडला? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या कधीकाळी तेलंगणाच्या शेतकऱ्यांच्या होत्या. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आपल्याला मिळू शकतात, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये असल्याने येथे बीआरएसला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

BRS
बीआरएस
author img

By

Published : Apr 24, 2023, 10:48 PM IST

मुंबई / छत्रपती संभाजीनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आपला पक्ष वाढवायला सुरुवात केली आहे. तेलंगणाला लागून असलेल्या नांदेड पासून सुरुवात करून त्यांचा मराठवाड्यावर प्रभाव टाकायचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि विरोधी पक्षाला असलेला वाव पाहता महाराष्ट्रात सध्या पक्ष वाढवण्यासाठी योग्य परिस्थिती आहे असे जाणूनच के. चंद्रशेखर राव आणि त्यांचे सहकारी महाराष्ट्रात पक्ष रुजवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मराठवाडाच का? : मुंबई, पुणे, नाशिक सारखी मोठी शहर सोडून बीआरएस पक्ष मराठवाड्यात दाखल होत आहे. त्यामुळे त्यांनी हाच भाग का निवडला? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र याबाबत पक्षाचे आमदार जीवन रेड्डी यांनी काही मुद्दे स्पष्ट केले. तेलंगना मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यात जवळचा भाग आहे. तेलंगणा येथे केलेल्या विकास कामांची दखल नागरिक घेत असून शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी केलेल्या कामाला नांदेडकडच्या भागातील नागरिक प्रतिसाद देत आहे. त्यामुळे सर्वात आधी नांदेडमध्ये जाहीर सभा घेण्यात आली.

भौगोलिक सलगता आणि समान संस्कृती : मराठवाडा आणि तेलंगणा यांचा रोटी-बेटीचा व्यवहार आधीपासून आहे. त्यामुळे मराठवाड्यात पक्षाला अधिक चालना मिळेल यात शंका नाही. तितकेच नाही तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या कधीकाळी तेलंगणाच्या शेतकऱ्यांच्या होत्या. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आपल्याला मिळू शकतात, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये असल्याने येथे बीआरएसला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. म्हणून बीआरएस हा मराठवाड्यात आपल्या पक्षाला घेऊन आला, अशी माहिती आमदार जीवन रेड्डी यांनी दिली. यासाठी तेलंगणातील जीवन रेड्डी, बलका सूमन, जोगु रमन्ना आणि हनुमंत शिंदे हे चार आमदार मराठवाड्यावर लक्ष ठेवून आहेत.

तेलंगणाच्या सुविधांची सीमावर्तीय भागातील गावांवर छाप : नांदेडसह तेलंगणा सीमेलगत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक गावांना तेलंगणाच्या सेवा सुविधांची चांगलीच भुरळ पडली आहे. त्यामुळे या गावांप्रमाणेच आपल्यालाही सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी इथल्या काही गावांनी राज्य सरकारकडे आपल्याला तेलंगणा राज्यात समाविष्ट व्हायला परवानगी द्यावी, अशी मागणीही केली होती. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या पाय रोवण्यासाठी ही संधी आणि वेळ योग्य असल्याचे बीआरएसचे म्हणणे आहे. म्हणूनच सीमावर्ती भागातून प्रवेश करून तेलंगणाला जवळ असलेल्या मराठवाड्यात आधी पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने हालचाली या पक्षाने सुरु केल्या आहेत. यासाठी पक्षाने अनेक नाराज नेत्यांना आणि आमदारांना आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते बीआरएसच्या गळाला लागल्याचे सध्या पाहायला मिळते आहे.

हेही वाचा : KCR Rally In Sambhaji Nagar : केसीआर यांची एंट्री महाराष्ट्रातील राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.