मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज न्यायालयाने (Mumbai high court) जामीन मंजूर केलेला आहे. जामीन मंजूर होताच नागपूरातील अनिल देशमुख समर्थकांनी त्यांच्या निवास स्थानाबाहेर जल्लोष केलेला आहे. ढोल ताशांच्या गजरात मिठाईवाटून आणि फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलेला आहे.
आनंदाचे वातावरण : शंभर कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या 13 महिन्यांपासून कारागृहात आहेत. मध्यंतरी अनिल देशमुख यांच्या दोन्ही मुलांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर अनिल देशमुख यांना सुद्धा जामीन मिळण्याची शक्यता वाढली होती. आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झालेला (Mumbai high court granted bail) आहे.
शशिकांत शिंदे : जे आरोप झाले ते, राजकीय षडयंत्र आहे. जे नेते आक्रमक पद्धतीने काम करत होते, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता. जे आरोप केले ते, न्यायालयात सिद्ध करू शकले नाहीत. जो न्याय देशमुख यांना मिळाला तो न्याय मलिकांना मिळेल. शेवटी सत्याचा विजय होतो. जो गुन्हा दाखल केला होता, तो राजकीय होता. संजय राऊत असतील किंवा अनिल देशमुख हे राजकीय गुन्हे होते. जरी सीबीआयने सुप्रीम कोर्टात जाण्याचा प्रयत्न केला, तरी संजय राऊत यांना जो दिलासा मिळाला तो दिलासा कायम मिळेल. ही केस रचुन केली आहे. संजय राऊत यांना जामीन मिळाला, अनिल देशमुख यांना मिळाला असाच न्याय नवाब मलिक यांना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त (Reactions On Anil Deshmukh Bail ) केली.