ETV Bharat / state

Vikram Gokhale Passed Away : अभिनयाचा समृध्द वारसा लाभलेला तारा निखळला, विक्रम गोखले यांचे निधन

vikram gokhle
विक्रम गोखले
author img

By

Published : Nov 26, 2022, 3:59 PM IST

Updated : Nov 27, 2022, 9:02 PM IST

20:45 November 27

20:42 November 27

विक्रम गोखले यांना सिनेसृष्टी कधीही विसरू शकणार नाही - पंकजा मुंडे

मराठी, हिंदी चित्रपट, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमातून आपल्या अभियनाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे. माझा आणि त्यांचा फोनवर नेहमीच संवाद व्हायचा पण आमची भेट अखेर राहूनच गेली अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

आणि अखेर ती भेट राहिली - आपल्या भावना व्यक्त करतांना पंकजा म्हणाल्या की, 'ज्येष्ठ अभिनेते, एक हरहुन्नरी असा कलाकार आज आपल्यात राहिला नाही, मी सन्माननीय विक्रम गोखले यांना मनापासून श्रध्दांजली, आदरांजली वाहते. अनेक वेळा त्यांचा मला फोन यायचा आणि फोनवर ते भरपूर गप्पा मारायचे. माझे ट्विट बघायचे, माझे स्टेटमेंट बघायचे, माझ्या भाषणांवर प्रतिक्रिया द्यायचे आणि बऱ्याच वेळा म्हणायचे, तुझा धाडसीपणा मला खूप आवडतो. इतकं भरभरून कौतुक एवढं मोठं यश मिळवलेल्या व्यक्तीकडून ऐकून मला खूप आनंद होत असे. मला एकदा असंच म्हणाले, ' विक्रमकाकांना एकदा काॅफी प्यायला बोलवं, भरभरून गप्पा मारू ', पण ते राहूनच गेलं. त्यांच्या त्या बोलण्याची आठवण सदैव होत राहिल. कठीण काळात एवढया मोठया व्यक्तीने दोन शब्दांचा दिलेला आधार सदैव माझ्या आठवणीत राहील. विक्रम गोखले हे एक असे अभिनेते आहेत, ज्यांना सिनेसृष्टी कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी प्रत्येक रोलला एक डिग्निटी, उंची प्रदान करून दिली. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे व राहील.'

20:38 November 27

विक्रम गोखले : असा नट पुन्हा होणे नाही! - अमित बहल

विक्रम गोखले हे बरीच वर्षे मनोरंजनक्षेत्रातील लोकांसाठी धडपडत होते. ते सिंटाचे प्रेसिडेंट होते आणि सिंटाचे सेक्रेटरी श्री. अमित बहल यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांना सांगितले की, "मी खूप जड अंतकरणाने तुमच्याशी बोलत आहे. विक्रमजी मला वडीलांप्रमाणे होते. माझे वडील गेले त्याच्यापेक्षाही अधिक दुःख मला विक्रम गोखले यांच्या जाण्याने झाले आहे. आम्ही सिंटा मध्ये एकत्र काम करीत असताना त्यांची मनोरंजनसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञ व कामगारांविषयीची तळमळ मी जवळून अनुभवली आहे. आम्ही चार सिनेमे आणि पाच सिरीयल मध्ये एकत्र काम केलं आहे आणि त्या सर्वांत त्यांनी माझ्या वडिलांची भूमिका साकारली होती. ते अभिनय करताहेत असे कधी जाणवलेही नाही. अप्रतिम अभिनेता, उत्तम ब्यकी आणि जराही इगो नसलेला माणूस म्हणजे विक्रम जी होते."

लेखक, दिग्दर्शक संजीव यशवंत कोलते यांनी विक्रम गोखलेंसोबत खूप काम केलं आहे. त्यांनाही विक्रमजींच्या जाण्याने धक्का बसला आहे. ते भावनिक होत म्हणाले, "आमची ३०-३२ वर्षांची ओळख. त्यांच्यासारख्या अभिनेत्याने माझ्याबरोबर काम केले हे मी माझे भाग्य समजतो. विक्रम गोखले म्हणजे अभिनयाचे आणि माणुसकीचे स्वतंत्र विद्यापीठ. त्यांना प्रत्येक गोष्टीत पर्फेकशन लागे. अगदी लिखाणातही. त्यांनी नेहमीच प्रत्येक भूमिका अत्यंत मेहनतीने, सचोटीने केली. त्यांची कमिटमेंट तर बघायलाच नको.

आठवणींना उजाळा - आम्ही एक चित्रपट करीत होतो. विक्रम गोखले, संतोष जुवेकर, अरुण नलावडे ई. त्यात होते. पुण्याला शूट लागणार होतं. परंतु त्याच्या २५ दिवस आधी विक्रमजींच्या 'नी रीप्लेसमेंट' चं ऑपरेशन झालं. आम्ही सर्वजण व्यथित होतो. डॉक्टरांनी त्यांना शूटिंग साठी अजिबात परवानगी दिली नाही. त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, 'घाबरु नकोस. मी शूटिंगला येणार म्हणजे येणार'. आणि ते आले, सर्व शूट पूर्ण केलं. अशी त्यांची वचनबद्धता होती. अजून एक किस्सा म्हणजे, मी दूरदर्शन साठी एक सिरीयल करीत होतो. त्यांची माझी अचानक भेट झाली आणि त्यांनी विचारले इथे काय करतोयस. मी म्हटलं सिरीयल करतोय. त्यांनी विचारलं मी का नाही त्यात? तेव्हा म्हणालो कॉमेडी सिरीयल आहे. ए फंसा नावाची. त्यांनी विचारलं, मी कॉमेडी करू शकत नाही? तेव्हा मी त्यांच्यासाठी एक रोल लिहिला आणि विक्रमजींनी उत्तम कॉमेडी केली. त्यांनी मला पुस्तकं लिहिण्यास उद्युक्त केले. माझे पुस्तक अतरंगी कट्टा चे प्रकाशन त्यांच्या हस्तेच झालं. त्यांच्याकडून मला खूप प्रेम मिळालं. खरंच असा थोर नट पुन्हा होणे नाही! भावपूर्ण श्रद्धंजली."

17:21 November 26

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत चांगल्या कलाकाराला मुकली - सचिन सावंत

कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विक्रम गोखले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, विक्रम गोखले हे उत्तम अभिनेते होते. त्यांनी त्यांच्या अभिनयाने रसिकांना आनंद दिला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत चांगल्या कलाकाराला मुकली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!

17:08 November 26

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याकडून खूप शिकण्यासारखे - अभिनेते अक्षय कुमार

अभिनेत अक्षय कुमार यांनी देखील विक्रम गोखले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी कळताच खूप दुःख झाले. भूल भुलैया, मिशन मंगल यांसारख्या चित्रपटात त्यांच्यासोबत काम केल्याने त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते. ओम शांती

17:02 November 26

विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त दुःख देणारे - खासदार सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट मध्यातून जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. ते दर्जेदार अभिनेते होते. त्यांनी रंगभूमी तसेच रुपेरी पडद्यावर साकारलेल्या अनेक भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली - मराठी हिंदी तसेच नाटक इंग्रजी या सर्व भाषेत आपल्या अभिनयाने स्थान निर्माण करणारे बेस्ट अभिनेते विक्रम गोखले यांचा आज निधन झालं. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील पोकळी कधीच निर्माण करता येणार नाही, असे त्यांच्या चाहत्यांनी मत व्यक्त केलेले आहे. तरुणाई पासून ते वयोवृद्धाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे विक्रम गोखले यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या काही च्या हाताने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

16:53 November 26

सर्जनशील कलावंत आणि मार्गदर्शक आपल्यातून निघून गेला - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटलंय की, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने कलेच्या प्रांतातील एक सर्जनशील कलावंत आणि मार्गदर्शक आपल्यातून निघून गेला आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी मराठी, हिंदी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत अत्यंत आदराचे स्थान मिळविले. त्यांच्याबद्दल साऱ्यांनाच वाटत असलेली आदरयुक्त भीती हा मराठी माणसाच्या अभिमानाचा विषय होता. चित्रपट सृष्टीसारख्या मायावी जगाच्या पलीकडेही एक जग आहे आणि त्या जगातील सामान्य माणसांच्या वेदनेशी, जगण्याशी आपण एकरूप व्हायला हवे, हे मूल्य त्यांनी आयुष्यभर जोपासले. या श्रेष्ठ कलावंत, विचारवंताच्या नसण्याची ही उणीव नेहमी जाणवत राहणार आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

16:26 November 26

मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता हरपला - शरद पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी तिन्ही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता हरपला.

16:24 November 26

चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. भावपूर्ण श्रद्धांजली!

15:59 November 26

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमाजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. शोकसंदेशात ते म्हणाले की, मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमाजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे. प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणार्‍या, ती व्यक्तिरेखा जीवंत साकारणार्‍या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना लाभो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना ! ॐ शांति.

15:47 November 26

विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलं - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ज्येष्ठ संवेदनशील अभिनेते विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठी नाट्य, सिनेसृष्टीतील चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली. तसेच त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीच नव्हे तर चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात त्यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली.

मंत्री पाटील आपल्या शोक संदेशात म्हणाले की, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतः चं वेगळं स्थान निर्माण केलं. अभिनय क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांसाठी ते चालतं-बोलतं विद्यापीठ होते. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीचे कधीही भरुन निघणार नाही असे नुकसान झाले आहे. त्यांची संवादशैली ही प्रत्येकालाच प्रभावित करणारी होती. 'वजीर' या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात कायम आहे. मराठी साहित्य, सांस्कृतिक ,राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात या ‘वजीर’ची खूप चर्चा झाली. त्यासोबतच नटसम्राटमधील गणपतराव बेलवलकर यांचे मित्र रामभाऊ अभ्यंकर यांची भूमिका नेहमीच स्मरणात राहील. एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणूनही ते कायम स्मरणात राहतील.

15:34 November 26

विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपला - सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने ( Vikram Gokhale Passed Away ) एक निष्ठावान कलातपस्वी हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मराठी रंगभूमी , मराठी व हिंदी चित्रपट , मालिका अशा तिन्ही माध्यमात त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर आपले कर्तृत्व सिद्ध केले. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या विक्रम गोखले यांनी अभिनयासोबत लेखन व दिग्दर्शन देखील केले आहे. अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ज्या ज्येष्ठ अभिनेत्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर मराठी रंगभूमी समृद्ध केली त्यात विक्रम गोखले यांचे नाव अग्रणी स्थानावर घेतले जाते. या कलातपस्वी व्यक्तिमत्वाने मराठी रंगभूमी सह मराठी व हिंदी चित्रसृष्टीसह मलिका क्षेत्र देखील गाजवले . त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

15:05 November 26

विक्रम गोखले गेले. विश्वास बसत नाही- उद्धव ठाकरे

मुंबई : चित्रपटसृष्टील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांनी आज अखेरचा श्वास ( Vikram Gokhale Passed Away ) घेतला. अभिनेते विक्रम गोखले ( Vikram Gokhale ) यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी पुण्यात निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ( Dinanath Mangeshkar Hospital ) उपचार घेत होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विक्रम गोखले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, विक्रम गोखले गेले. विश्वास बसत नाही. काल परवपर्यंत ते तसे संपर्कात होते. अनेक विषयांवर त्यांची मते ठाम असतं. एक कसदार राजबिंडा अभिनेते म्हणून चित्रपट रंगभूमी त्यांनी गाजवली. स्पष्ट संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. हिंदी सिनेसृष्टीतील तो लोकप्रिय मराठी चेहरा होता. त्यांचें जाणे चटका लावणारे आहे. मृत्यूवर मात करुन ते परत येतील असे वाटत होते.पण दुर्दैव. मी या महान अभीनेत्याला आदरांजली अर्पण करतो.

Last Updated : Nov 27, 2022, 9:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.