मुंबई - सुजय विखे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्या पत्नी धनश्री विखे-पाटीलही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. त्यांनी या प्रवेशासंबंधी माहिती देताना सांगितले की, एक पत्नी म्हणून माझा माझ्या पतीला कायम पाठिंबा राहणार आहे. ते कोणत्याही पक्षात जावो, मी त्यांच्यासोबत आहे. त्यांनी जो निर्णय घेतला तो विचारपूर्वक घेतला असून मला त्याचा आनंद आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अहमदनगरच्या जागेचा वाद निर्माण झाल्यानंतर सुजय यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले. त्यांनी आज मुंबईत येथे मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, आमदार राम कदम आणि आमदार कर्डीले आदि उपस्थित होते.
माझा निर्णय वैयक्तीक आहे. यात माझ्या घराच्यांची काही भूमिका नाही. मी यापुढे भाजपचेच काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्या पत्नी धनश्रीही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या पतीला पाठिंबा देत, मी त्यांच्या कायम पाठिशी आहे, असे ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितले.