ETV Bharat / state

G20 summit : जी २० परिषदेच्या बैठकीसांठी पालिकेचा कोट्यवधी खर्च; रवी राजा यांची पालिकेला खर्च उघड करण्याची मागणी - बृन्ममुंबई पालिका

जी २० चे परिषदचे अध्यक्षपद यंदा भारताला मिळाले ( India holds the presidency of the G20 summit ) आहे. त्या अनुषंगाने मुंबईमध्ये विविध कार्यक्रम आणि चर्चासत्राचे आयोजन ( G20 Council meetings in Mumbai ) करण्यात आले आहे. यासाठी मुंबईमध्ये सुशोभीकरण करण्यात आले आहे. यावर बृन्ममुंबई महानगर पालिकेने ( Brinmumbai Municipal Corporation ) तब्बल ३५ कोटी रुपये खर्च केले आहेत. हा पैसा करदात्या नागरिकांचा असल्याने तो कुठे आणि कसा खर्च केला याची माहिती उघड करावी, अशी मागणी पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

G20 summit
G20 summit
author img

By

Published : Dec 14, 2022, 8:40 PM IST

पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा बोलताना

मुंबई : जी २० परिषदेचे सन 2023 चे अध्यक्षपद भारताकडे ( India holds the presidency of the G20 summit ) आहे. यानिमित्त महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथे विविध बैठका होणार आहेत. मुंबईत 12 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत विविध देशांचे प्रतिनिधी येत ( G20 Council meetings in Mumbai ) आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे.

निविदा कधी काढल्या : जी २० साठी मुंबई महापालिकेने मुंबईमध्ये केलेले सुशोभीकरण आणि मुंबईमधील प्रदूषण होऊ नये म्हणून १० दिवस बांधकाम थांबवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. यावर रवी राजा बोलत होते. यावेळी बोलताना पालिकेकडून करण्यात येणारा खर्च हा करदात्या नागरिकांच्या पैशातून केला जातो. ३५ कोटी रुपये खर्च करताना कधी निविदा काढल्या, कोणाला काम देण्यात आले. किती जणांनी निविदा भरल्या, यासाठी कोणी किती रक्कम भरली होती याची कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. याबाबतची माहिती लोकांना कळावी म्हणून पालिकेच्या वेसाइटवर ती टाकायला हवी होती, पण तीही टाकण्यात आली नाही, असे रवी राजा म्हणाले.

आम्हीही माणसे : जी २० साठी मुंबईत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आहे. त्यांना इथली झोपडपट्टी दिसू नये म्हणून पडदे लावण्यात आले आहेत. इव्हेंटच्या ठिकाणी जे झेंडे लावण्यात आले आहेत त्या एका झेंड्यासाठी पालिकेने २४ हजार रुपये मोजले आहेत. त्याचबरोबर मुंबईत प्रदूषणाचा टक्का वाढू नये, म्हणून बांधकामे थांबविण्यात आली आहेत. डेब्रिज वगैरे घेवून जाणाऱ्या गाड्या सोडल्या जावू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. जी २० साठी आलेल्या पाहुण्यांना प्रदूषणाचा त्रास होवू नये म्हणून असे निर्बंध घातले गेले आहेत. मग आम्ही माणसं नाही का? आम्ही इथे कायम राहणारी माणसं आहोत आम्ही प्रदूषण सहन करायचे का, त्यासाठी तुम्ही काही करणार नाही, असा सवालही रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.