ETV Bharat / state

फोन टॅपिंग प्रकरण : अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी रश्मी शुक्लांची उच्च न्यायालयात धाव

सध्या हैदराबाद येथे सीआरपीएफच्या अतिरिक्त महासंचालक पदावर काम करत असलेल्या रश्मी शुक्ला यांची फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणांकडून अटकेची कारवाई केली जाऊ नये, अशी मागणी करणारी एक याचिका शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Rashmi Shukla HC petition news
रश्मी शुक्ला उच्च न्यायालय याचिका
author img

By

Published : May 3, 2021, 11:44 AM IST

मुंबई - फोन टॅपिंग प्रकरणी वादात अडकलेल्या राज्य गुप्तवार्ता पथकाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. तपास यंत्रणांकडून अटकेची कारवाई केली जाऊ नये, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. त्यांना खोट्या व बिनबुडाच्या प्रकरणांमध्ये अडकवले जाण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही याचिकेत शुक्ला यांनी म्हटले आहे. फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. या संदर्भात चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून शुक्ला यांना दोन वेळा समन्स बजावण्यात आले आहेत.

दोनदा मिळाले चौकशीचे समन्स -

सध्या हैदराबाद येथे सीआरपीएफच्या अतिरिक्त महासंचालक पदावर काम करत असलेल्या रश्मी शुक्ला यांनी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या समन्सला उत्तर दिले आहे. कोरोना संक्रमण पाहता त्या प्रत्यक्षरीत्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या पथकासमोर हजर होऊ शकणार नाही. त्यामुळे चौकशीचे प्रश्न त्यांना मेलवर देण्यात यावेत, अशी त्यांनी मागणी केली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून शुक्ला यांना दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आले व त्यांना 3 मेपर्यंत चौकशीसाठी तयार राहण्याचे सुचित करण्यात आलेआहे. या समन्समध्ये चौकशीसाठी त्यांना त्यांच्या राहत्या घरी उपस्थित राहण्यास मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. या अगोदर 21 एप्रिल रोजी रश्मी शुक्ला यांची तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या शंभर कोटींच्या वसुली प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला व शुक्लांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.

काय आहे फोन टॅपिंग प्रकरण -

तत्कालीन राज्य पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांच्याकडे तत्कालीन राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग प्रकरणातील अहवाल पाठवलेला होता. या अहवालामध्ये त्यांनी नमूद केले होते की, राज्याततील काही पोलीस अधिकारी हे क्रीम पोस्टिंगसाठी मंत्री व काही एजंटना हाताशी धरून स्वतःची बदली करून घेतात. या प्रकरणी काही जणांना अटक सुद्धा करण्यात आल्याचे शुक्ला यांनी सांगितलेले होते. हा प्रकार गंभीर असून याची माहिती मुख्यमंत्र्यांना द्यावी, असे या गोपनीय अहवालात म्हटले होत. मात्र, फोन टॅपिंगसाठी कुठलीही कायदेशीर परवानगी न घेता काही अधिकारी व मंत्र्यांचे फोन टॅप करण्यात आल्यामुळे या प्रकरणी मोठा वाद निर्माण झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.