मुंबई - भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक पार पडली असून आम्ही सर्वांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. आज संध्याकाळी भाजपच्या सर्व आमदारांची बैठक गरवारे क्लब येथे पार पडणार आहे. उद्या (बुधवार) भाजप निश्चितपणे विश्वास दर्शक ठराव जिंकणार, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दानवे म्हणाले, 'कोर कमिटीच्या निर्णयानुसार आज संध्याकाळी भाजप आमदारांची बैठक बोलवण्यात आली असून आम्ही रणनीती ठरवू . उद्या भाजप निश्चितपणे विश्वास दर्शक ठराव जिंकणार आहे.
महाराष्ट्रामधील सत्तानाट्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने उद्या २७ नोव्हेंबरला बहुमत चाचणी घेण्यास सांगितले आहे. उद्या ५ वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करण्यात यावा असेही न्यायालयाने सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे या विश्वासदर्शक ठरावाचे लाईव्ह चित्रीकरण करण्यात येणार आहे.
हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, शिवसेनेला केले 'असे' आवाहन...
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ गटनेता कोण? आता राज्यपालांवर सर्व भिस्त