ETV Bharat / state

Savarkar Vs Gandhi : सावरकरांचे नातु रणजीत यांची राहुल गांधींविरोधात पोलीस तक्रार, राहुल गांधींनी असा केला पलटवार - रणजीत सावरकर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत यात्रा महाराष्ट्रात पोहोचली असताना मोठा वाद ( Ranjit Savarkar to complaint in Police station ) निर्माण होत आहे. वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती ( Police station against Rahul Gandhi ) माध्यमांना दिली. दरम्यान दुपारी त्यांनी दादरमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 17, 2022, 11:24 AM IST

Updated : Nov 17, 2022, 6:46 PM IST

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत यात्रा महाराष्ट्रात पोहोचली असताना मोठा वाद ( Ranjit Savarkar to complaint in Police station ) निर्माण होत आहे. वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती ( Police station against Rahul Gandhi ) माध्यमांना दिली. राहुल गांधी माध्यमांशी बोलतांना म्हणाले, की भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर त्यांनी जरूर रोखावी. प्रत्येकाने आपापले मत मांडावे. सरकारला ही यात्रा रोखायची असेल, तर त्यांनी तो प्रयत्न करावा. सावरकरांनी लिहिलेला माफीनामा फडणवीस यांनी वाचायला हवा होता, असा टोलाही त्यांनी लगावला.

सावरकरांनी माफी मागितल्याचे पुरावने नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो अभियाना दरम्यान स्वातंत्रवीर सावरकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले ( Rahul Gandhi for offensive statements about Veer Savarkar and RSS ) होते.

प्रतिक्रिया देताना वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर

सावरकरांबाबत जनभावना तीव्र : राहुल गांधी असले उद्योग नेहमीच करत असतात. जेव्हा त्यांना काही मुद्दा उरत नाही. आपल्याला कोण किंमत देत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात येते. तेव्हा ते अशी खळबळजनक वक्तव्य करतात. आपण पाहिले असेल माध्यमांनी देखील त्यांच्या भारत जोडो यात्रेची काही दखल घेतलेली नाही. सावरकरांबाबत लोकांची जनभावना तीव्र आहे. हे लक्षात घेऊनच राहुल गांधी अशी वक्तव्य करतात. आणि अशा वक्तव्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काही दखल घेत नाही हे दुर्दैव आहे, रणजीत सावरकर यांनी म्हटले. दरम्यान दुपारी त्यांनी दादरमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

वीर पुरुषांचा अवमान : राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात स्वतंत्र सैनिकांची बदनामी, वीर पुरुषांचा अवमान याबाबत दाखल तक्रार दाखल करणार आहे. काल मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच मंचावर होतो. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना याबाबत बोललो. उद्धव ठाकरे समर्थन करत नाहीत याला काय अर्थ आहे का? कारण, ते समर्थन करत नसले तरी विरोध तरी कुठे करतात? आज नाना पाटोले यांनी देखील बाळासाहेबांच्या स्मृतीदिना दिवशी सावरकरांना शिव्या घातल्या आहेत. अनेक काँग्रेस नेते तिकडे स्मृतीस्थळावर येतील. अशा वेळी शिवसेनेचे नेते काँग्रेस त्यांचे कसे स्वागत करतात हे देखील आपण बघू शकतो. राहिला प्रश्न त्यांना भारतरत्न देण्याबाबत तर त्यांना असा कोणताही पुरस्कार द्यावा, त्यांना भारतरत्न द्यावा. अशी कोणतीही मागणी आम्ही कुटुंबीय म्हणून कधीही केलेली नाही. अशा पुरस्कारांवर आमचा विश्वास नाही. आम्ही ते मानत (offensive statements about Veer Savarkar) नाही.

असा आहे सावरकर आणि वाद १९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येच्या सहाव्या दिवशी सावरकरांना गांधी हत्येचा कट रचल्याप्रकरणी मुंबईतून अटक केली होती. नंतर फेब्रवारी १९४९ मध्ये त्यांची मुक्तता करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनसंघाचे कधीही सदस्य न राहिलेल्या सावरकरांचे नाव संघ परिवारात मोठ्या आदराने घेतले जाते. वर्ष २००० मध्ये वाजपेयी सरकारने तत्कालीन राष्ट्पती के.आर. नारायणन यांच्याकडे सावरकरांना 'भारत रत्न' देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. परंतु तो मंजूर करण्यात आला नाही.त्यानंतर २६ मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवासात वीर सावरकरांची १३१ वी जयंती होती. त्यावेळी मोदी संसद भवनातील सावरकरांच्या तैलचित्रासमोर नतमस्तक झाले होते. सर्वांना कबूल करावे लागेल, की सावरकर वादग्रस्त व्यक्तिमत्व होते.गांधी हत्याकांड प्रकरणी सावरकारांविरुद्ध खटला चालला होता. जरी ते यातून निर्दोष सुटले होते, तरी त्यांच्या जीवनकाळातच त्यांच्या चौकशीसाठी कपूर आयोग बसवला होता. या आयोगाच्या अहवालात संशयाची सुई सावरकरांकडे होती. अशा नेत्याला सार्वजनिकरित्या इतका मोठा सन्मान देणे मोदींकडून मोठे प्रतीकात्मक पाऊल होते.

Last Updated : Nov 17, 2022, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.