ETV Bharat / state

Ramesh Bais Maharashtra Governor : रमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल; घेतली राज्यपाल पदाची शपथ

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी बैस यांना शपथ दिली. रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे २० वे राज्यपाल म्हणून विराजमान झाले आहेत.

author img

By

Published : Feb 18, 2023, 2:27 PM IST

Updated : Feb 18, 2023, 5:14 PM IST

GOVERNOR BAIS OATH
राज्यपाल पदाची शपथ
रमेश बैस

मुंबई : महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी बैस यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या आदेशाचे वाचन केले. मुख्य म्हणजे रमेश बैस यांनी मराठीतूनच राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनच्या दरबार हॉल मध्ये दुपारी हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्याचे विविध मंत्री, आमदार उपस्थित होते.

यापूर्वी त्रिपुरा व झारखंडचे राज्यपाल : नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक मोठे नाव आहे. समाजकारण, राजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव रमेश बैस यांच्याकडे आहे. रमेश बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. यापूर्वी सन २०१९ साली बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. २९ जुलै २०१९ ते १३ जुलै २०२१ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल राहिले आहेत. १४ जुलै २०२१ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली झाली.

रमेश बैस यांचा अल्प परिचय : रमेश बैस यांचा जन्म रायपूर (छत्तीसगड) येथे दिनांक २ ऑगस्ट १९४७ रोजी झाला. त्यांचे यांचे शिक्षण रायपूर येथे झाले. रमेश बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्यात. रमेश बैस पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून १९७८ मध्ये निवडून आले. मध्यप्रदेश विधान परिषदेचे रमेश बैस हे १९८० ते १९८५ या कालावधीत सदस्य होते तो त्यांनी योग्य रित्या पार पडला. याकाळात रमेश बैस यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले. वर्ष १९८२ ते १९८८ या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्रीही होते. १९८९मध्ये साली बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर एकूण 7 वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात १९९८ साली रमेश बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

२०१९ मध्ये तिकिट नाकारले होते : २०१९ निवडणुकीमध्ये भाजपने रमेश बैस यांना तिकिट नाकारले होते. त्यानंतर त्यांची नाराजी समोर आली होती. त्यानंतरही त्यांनी भाजपचा प्रचार केला होता. याचं फळही त्यांना लगेच मिळालं होतं. 2014 साली मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर बैस यांना त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील नाट्यमय सत्तांतरानंतर महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली आहेत.

हेही वाचा : Chandrakant Patil On ECI Decision : त्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनला जावे, चंद्रकांत दादा पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

Last Updated : Feb 18, 2023, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.