ETV Bharat / state

Ramdev Baba Apologized : राज्य महिला आयोगाच्या नोटीसनंतर रामदेव बाबांना उपरती ; खेद व्यक्त करत मागितली माफी - रामदेव बाबा

रामदेव बाबा यांनी तीन दिवसांपूर्वी एका योगाच्या कार्यक्रमांमध्ये महिलांविषयी अपशब्द काढल्यामुळे नवा वाद उभा झालेला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या संदर्भात केलेल्या अपशब्द विधानाबाबत खुलासा करावा म्हणून त्यांना नोटीस पाठवली (notice of the Commission for Women) होती. रामदेव बाबा यांनी माफी नामा राज्य महिला आयोगाकडे सुपूर्द केला (Ramdev Baba apologized) आहे.

Ramdev Baba
रामदेव बाबा यांनी मागितली माफी
author img

By

Published : Nov 28, 2022, 9:50 AM IST

Updated : Nov 28, 2022, 1:11 PM IST

मुंबई : रामदेव बाबा यांनी तीन दिवसांपूर्वी एका योगाच्या कार्यक्रमांमध्ये महिलांविषयी अपशब्द काढल्यामुळे नवा वाद उभा झालेला आहे. हे अपशब्द काढत असताना अमृता फडणवीस देखील त्या मंचावर होत्या. त्यामुळे काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी अमृता फडणवीस आणि रामदेव बाबा यांच्यावर टीका देखील केलेली होती. तसेच रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची केली आहे. तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या संदर्भात केलेल्या अपशब्द विधानाबाबत खुलासा करावा म्हणून त्यांना नोटीस पाठवली (notice of the Commission for Women) होती. रामदेव बाबा यांनी माफीनामा राज्य महिला आयोगाकडे सुपूर्द केला (Ramdev Baba apologized) आहे.

माफीपत्र राज्य महिला आयोगाकडे सुपूर्द : बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेत, बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी मुदत दिली गेली होती. त्या मुदतीच्या आत रामदेव बाबा उर्फ राम किसन यादव यांनी महिलांच्या संदर्भात केलेला विधानाबाबत माफीपत्र राज्य महिला आयोगाकडे सुपूर्द केले (Commission for Women) आहे.

प्रतिक्रिया देताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर

काय आहे पत्रात : महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 अन्वये आरोप केल्यानुसार कोणताही गुन्हा केलेला नाही. महिलांना समाजात समान दर्जा मिळावा, यासाठी अधोस्वाक्षरींनी नेहमीच जागतिक स्तरावर महिला सक्षमीकरणासाठी काम केले आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ, यासारख्या भारत सरकारच्या विविध धोरणांचा आणि योजनांचा अधोस्वाक्षरींनी नेहमीच प्रचार केला आहे. भारतातील महिलांचा दर्जा वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी विविध संस्थांसोबत जवळून काम केले आहे. कोणत्याही महिलांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. ठाणे महाराष्ट्र येथे आयोजित केलेला संपूर्ण कार्यक्रम महिला सक्षमीकरणाशी संबंधित होता. कार्यक्रमाची काही सेकंदांची क्लिप ठळक करून सोशल मीडियावर प्रसारित केली जाते आहे. ते माझे शब्द आहेत पण चुकीचा अर्थ दिला जात आहे. मी नेहमीच माता आणि मातृशक्तीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगीर आहे. माझ्या बोलण्याने दुखावलेल्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो. असे पत्रात नमूद केले गेले आहे.

विधानामुळे महिला वर्गाचा अपमान : माफी नामा दिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, राज्य महिला आयोगाच्या वतीने 25 नोव्हेंबर रोजी मला कायद्यानुसार नोटीस पाठवलेली होती. कथेत या कायद्यानुसार मी काही अपराध केलेला नाही. मात्र अनवधानाने माझ्याकडून सार्वजनिक कार्यक्रमात स्त्रियांच्या कपड्यांच्या संदर्भात मी एक तासाच्या भाषणामध्ये बोलत असताना मातृशक्तीचा गौरव केला. माझे विधान करताना त्यावेळी हेतू होता की, महिलांचे साधे वस्त्र म्हणजे कपड्या संदर्भात मात्र माझ्या विधानामुळे महिला वर्गाचा अपमान झाला असेल, तर मी खेद व्यक्त करतो. अशा आशयाचे माफीपत्र त्यांनी राज्य महिला आयोगाकडे दिलेले (Ramdev Baba apologized After notice) आहे.

खुलासा पत्र : तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आरोपाली चाकणकर यांनी ईटीव्ही भारत सोबत बातचीत करताना म्हटले की, रामदेव किसन यादव उर्फ रामदेव बाबा यांनी अमानकारक वक्तव्य केल्याबाबत 25 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांना प्रथम नोटीस पाठवली. त्यानंतर त्यांना खुलासा मागवला होता. त्यांनी खुलासा पत्र पाठवलेले आहे. त्यात त्यांनी महिलांच्या प्रति काढलेल्या उद्गाराबाबत खेद व्यक्त केलेला आहे.

Last Updated : Nov 28, 2022, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.