मुंबई - कोरोना महामारीच्या भयंकर परिस्थितीत सफाई कंत्राटी कामगार साफसफाई करून महत्तवाची कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे, मुंबई, नवी मुंबई महानगरपालिका, ग्रामपंचायती यांनी या कंत्राटी सफाई कामगारांना विमा कवच द्यावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
या कामगारांना कामाच्यावेळी सॅनिटायझर, मास्कसारख्या आवश्यक गोष्टी देण्यात याव्यात. या गोष्टी मिळाल्याशिवाय या कामगारांनी काम करू नये, असे आठवले यांनी म्हटले. कंत्राटदारांनी अजून या कंत्राटी कामगारांचे वेतन थकीत ठेवल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे, त्यांना त्वरित वेतन द्यावे. रिपब्लिकन पक्ष आणि सामाजिक न्यायमंत्री म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे आठवले यांनी म्हटले.