मुंबई - महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला 'आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी' ही रॅली आझाद मैदान ते गेट ऑफ इंडियापर्यंत काढण्यात आली होती. ही रॅली गेट वे ऑफ इंडिया सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर, मुंबई उपनगर, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, नॅशनल युथ प्रोजेक्ट, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय नशा मुक्ती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आली होती.
"आम्ही दरवर्षी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने एक दिवस अगोदर म्हणजे एक ऑक्टोबर या दिवशी व्यसनमुक्तीसाठी आझाद मैदान ते गेटवे ऑफ इंडिया अशी रॅली काढत असतो. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आहे. व्यसनामुळे बिघडत चाललेले आयुष्य वाचावे यासाठी व्यसनमुक्ती करणाऱ्या अनेक संस्था व आताची तरुण पिढीने एकत्र येत व्यसनमुक्तीसाठी "आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी" अशी रॅली काढलेली आहे", असे व्यसनमुक्ती महामंडळ चिटणीस अमोल मडामे व वर्षा विलास यांनी सांगितले.
हेही वाचा - गांधी@150; ईटीव्ही भारतच्या माध्यमातून देशातील सर्वश्रेष्ठ गायकांकडून बापूंना संगीतमय श्रद्धांजली
नशा म्हणजेच नाश, आम्ही विद्यार्थी व्यसनमुक्तीचे सारथी अशा व्यसनमुक्तीच्या घोषणांनी आझाद मैदान ते गेट वे ऑफ इंडिया परिसर दुमदुमत होता. हजारो तरुण, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते व्यसनमुक्तीसाठी रस्त्यावर उतरून 'निर्व्यसनी महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र' असा संदेश देत होते. तसेच व्यसनमुक्तीसाठी पथनाट्य व विविध छायाचित्र पोस्टर घेऊन व्यसन करू नये यासाठी विद्यार्थ्यांनी लोकांना आवाहन केले.
हेही वाचा - महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरात 150 ठिकाणी गांधीवादी करणार उपवास