मुंबई: पती आदिल खान दुर्रानी याच्या विरोधात सोमवारी मीडियाशी बोलताना राखीने आदिलवर तिची आई जया भेडा यांच्या उपचारासाठी पैसे न दिल्याचा आरोप केला होता. राखीने असा देखील गंभीर आरोप केला आहे की, ती जेव्हा बिगबॉस मराठीमध्ये गेली त्यापूर्वी तिने आईच्या उपचाराकरता आदिलकडे दहा लाख रुपये दिले होते. मात्र जेव्हा आईला खरोखरच ऑपरेशनच्या वेळी पैशाची गरज होती तेव्हा आदिलने पैसे दिले नाहीत. आदिलमुळेच आईचा मृत्यू झाल्याचेही तिने सांगितले. राखीने असाही दावा केला की, आदिलने तिला सांगितले की, तो तिच्यापासून वेगळे झाला आहे. तो त्याची मैत्रीण तनुसोबत राहत आहे.
राखीने केला आरोप: आदिलने अखेर त्याची गर्लफ्रेंड तनुसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. असे राखीने मीडियाला सांगितल्यानंतर काही तासांतच पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली. तिने तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि बॉलिवूडमध्ये स्टार बनण्यासाठी तिला शिडी म्हणून वापरल्याचा आरोप केला. तिच्याकडे असलेले सर्व पैसे आदिलने घेतल्याचा आरोपही राखीने केला. आदिल विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत, असा दावा तिने केला. ओशिवरा पोलिस ठाण्यानंतर राखीला आदिलसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये दिसली होती. दोघांचा एकत्र डिनर करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत एकमेकांना खास भरवताना देखील दिसले होते.
आदिल निकाह देखील कबूल करत नव्हता: राखी सावंतने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आदिल बरोबर निकाह झाल्याचा खळबळजनक माहिती मीडियासमोर आणली. सात महिन्यांपूर्वी राखीने आदिल सोबत निकाह केला असल्याची तिने माहिती दिली होती. सोशल मीडियावर राखीने आदिल सोबतच्या झालेल्या निकाहचे फोटो देखील वायरल केले होते. मात्र, आदिल ही गोष्ट स्वीकारत नसल्याने राखीला रडू कोसळले होते. मात्र, काही दिवसांनी आदिलने राखी सोबत निकाह झाल्याचे मान्य केले.
राखी सावंतवर दु:खाचा डोंगर: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतवर शनिवारी दु:खाचा डोंगर कोसळला होता. राखी सावंत हिच्या आईला ब्रेन ट्युमर आणि कॅन्सर झाल्याचे राखी सावंतनेच सोशल मीडियावर लाईव्ह करून सांगितले होते. नंतर आईची तब्येत बिघडत असल्याचे देखील राखीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. राखीची आई जया सावंत यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही. गेले अनेक दिवस मृत्यूशी लढत असलेली लढाई जया सावंत हरल्या होत्या. त्यांचे अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात निधन झाले होते.