ETV Bharat / state

राजू शेट्टी-उद्धव ठाकरे भेट; स्वाभिमानी संघटना राज्यात 'इतक्या' जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक - Matoshree

Raju ShettI Met Uddhav Thackeray : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज (2 जानेवारी) अचानक मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. राजू शेट्टी हे महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार आहेत का? याबाबत तुम्ही ठाकरेंची भेट घेतली का, असं शेट्टींना विचारण्यात आलं. मात्र, ही भेट राजकीय नसून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत होती, असं शेट्टी म्हणाले.

Raju Shetty
राजू शेट्टी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 6:27 PM IST

Updated : Jan 2, 2024, 7:11 PM IST

मुंबई Raju Shetti Met Uddhav Thackeray : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सध्या राज्यातील दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत (Farmer Issue) आपण उद्धव ठाकरेंची भेट (Uddhav Thackeray) घेतली असल्याचं राजू शेट्टी यांनी माध्यमांना सांगितलं.

भेट राजकीय नव्हती : लोकसभा निवडणुकीबाबत (Loksabha Election) जागावाटप आणि उमेदवारीवरून सध्या राजकीय पक्षात गणित सुरू आहेत. यावरुन महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागावाटप आणि कोण किती जागा लढवणार याबाबत चर्चा सुरू आहेत. अशातच राजू शेट्टी हे उद्धव ठाकरेंसोबत एकत्र निवडणूक लढवणार का? असा प्रश्न शेट्टी यांना विचारला होता. ही भेट राजकीय नव्हती, असं राजू शेट्टी म्हणाले. सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे कांदा प्रश्न, शेती मालाला हमीभाव, दुष्काळ आणि अवकाळी पाऊस याबाबत मी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली. उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांविषयी संवेदनशील आहेत, म्हणून मी त्यांना भेटायला आलो, असं राजू शेट्टी म्हणाले.

Raju ShettI Met Uddhav Thackeray
राजू शेट्टींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

स्वतंत्र निवडणूक लढवणार : पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आपण लोकसभा निवडणूक स्वतंत्र्य लढवणार असून, कुठल्याही पक्षांसोबत निवडणूक लढवणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणूक स्वतंत्र्य लढवणार आहे. राज्यात सहा जागांवर आपण निवडणूक लढवणार असल्याचं राजू शेट्टींनी यावेळी सांगितलं. दरम्यान, सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास अपयशी ठरत असल्याचीही टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर यावेळी केली.

कोल्हापुरात तर्क-वितर्क : राजू शेट्टी-उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात तर्क-वितर्क लावले जात आहेत. राजू शेट्टींची भेट ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाही तर लोकसभा निवडणुकीच्या जागांसंदर्भात झाली, राजू शेट्टींचा पूर्व इतिहास माहीत असताना त्यांना आता महाविकास आघाडीत धारा देऊ नये, असं आवाहन उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केलंय.

हेही वाचा -

  1. राजू शेट्टींचा पुन्हा एल्गार; अंतिम बिलापोटी शेतकऱ्यांना 400 जादा द्या, अन्यथा....
  2. Raju Shetti News: शरद पवार दर आठवड्याला वक्तव्य बदलतात-राजू शेट्टी
  3. स्वाभिमानीच्या लढ्याला यश; शंभर रुपये दुसऱ्या हप्त्याची मागणी साखर कारखानदारांनी केली मान्य

Last Updated : Jan 2, 2024, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.