ETV Bharat / state

खासगी कोविड रुग्णालयातील बिलांची तपासणी सरकारी ऑडिटर करणार- आरोग्यमंत्री टोपे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना रुग्णांकडून घेण्यात येणाऱ्या बिलांची तपासणी सरकारी ऑडिटर करणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यभरातून खासगी रुग्णालयांकडून भरमसाठ बील देऊन रुग्णांची पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

Rajesh Tope
राजेश टोपे
author img

By

Published : Jul 20, 2020, 8:30 AM IST

मुंबई- कोरोनाबाधित रुग्णांना भरमसाठ बील देऊन कोरोना रुग्णांची पिळवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इशारा दिला आहे. आरोग्यमंत्र्यांनी खासगी कोविड रुग्णालयातील बिलं सरकारी ऑडिटर तपासणार असल्याचे सांगितले आहे. खासगी रुग्णालयांकडून भरमसाठ बील देऊन कोरोना रुग्णांची पिळवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले होते.

कोरोना विषाणू उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाजवी आकारणी (बिल) होत असल्याच्या तक्रारींची मुंबई महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने विविध खासगी रुग्णालयांसाठी महापालिका मुख्य लेखापरीक्षक खात्यातील, लेखापरीक्षकांची नेमणूक केली आहे. तेव्हापासून आजपर्यंत 37 रुग्णालयांतील 625 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.

कोरोनाच्या संकटात खासगी रुग्णालयांकडून पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी राज्यभरातून येत आहेत. खासगी रुग्णालयांची बिलं तपासण्याचा निर्णय कोरोना रुग्णांसाठी लाभदायक ठरेल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान,राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या 3 लाख 10 हजार 455 वर पोहोचली आहे. 1 लाख 69 हजार 569 जण कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 11 हजार 854 वर पोहोचलीय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.