मुंबई : समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची आज 149 वी जयंती साजरी केली जात आहे. सामान्य लोकांना सामाजिक न्याय मिळावा. प्रत्येक नागरिकांना समान न्याय मिळावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांना आठवले जाते. महाराजांची आज 149 जयंती आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला होता. महाराजांच्या वडिलांचे नाव जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे होते. तर त्यांची आईचे नाव राधाबाई होते. शाहू महाराजांचे मूळ नाव हे यशवंतराव होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, हे कोल्हापूरचे शाहू व चौथे साहू अशा विविध नावाने प्रसिद्ध होते.
आरक्षणाचे जनक: शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, आरक्षण, समता, आणि बंधुता अशा विविध गोष्टींसाठी त्यांना आठवले जाते. पण अनेकांना शाहू महाराज यांच्याविषयी पुरेसे माहिती नाही. छत्रपती शाहू महाराजांनी राज्याची सूत्रे हातात घेताच त्यांनी राज्य आणि समाजावरील ब्राह्मणांचे वर्चस्व मोडून काढले होते. 26 जुलै 1902 रोजी भारतीय इतिहासात त्यांनी ते केले जे कोणीही कल्पना केली नसेल. शाहूजी महाराजांनी 26 जुलै रोजी चित्पावन ब्राह्मणांच्या तीव्र विरोधानंतर आपल्या राज्यात दलित-मागासांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण लागू केले. म्हणूनच शाहूजींना आधुनिक आरक्षणाचे जनक म्हटले जाते. पुढे बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांनी भारतीय संविधानात शाहूजींनी लागू केलेल्या आरक्षणाचा विस्तार केला. आधुनिक भारतातील जातीवर आधारित हे पहिले आरक्षण होते. त्याचप्रमाणे महाराजांनी हिंदू वारसा हक्काचा निर्बंधावर मोठा निर्णय घेतला. शूद्रांची अनौरस संतती आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रिवर्णांची अनौरस संतती यांच्या वारसाहक्कातील तफावत महाराजांनी नष्ट केली.
महाराजांनी केलेले कार्य : शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांचे वृत्तपत्र मूकनायकला सहकार्य केले. शाहू महाराजांना सामाजिक कार्य करणारा राजा असं म्हटलं जाते. त्यांनी समाजातील अनेक रुढी, परंपरा नष्ट केल्या. यामुळे राज्य सरकार शाहू महाराजांचा जन्म दिवस हा 2006 पासून”सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. वाघ्या-मुरळी प्रतिबंधक कायदा, स्त्री पुनर्विवाह कायदा, आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा करत त्यांनी समाजात मोठा बदल घडवून आणला होता.