ETV Bharat / state

MNS : रविवारी मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा, राज ठाकरे काय देणार कानमंत्र? - राज ठाकरे यांचा कोकण दौरा

मनसे पक्ष (MNS) मजबूत करण्यासाठी आता स्वतः राज ठाकरे ( Raj Thackeray) मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या सर्व गटाध्यक्षांचा (MNS group presidents ) मेळावा राज ठाकरे घेणार आहेत. रविवारी मुंबईतील गोरेगावमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे गटाध्यक्षांना काय कानमंत्र देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागुन राहिल आहे.

raj thackeray
राज ठाकरे
author img

By

Published : Nov 26, 2022, 6:14 PM IST

मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) आपल्या कार्यकर्त्यांना 'महाराष्ट्रात जी काही सध्या परिस्थिती आहे. त्याकडे एक संधी म्हणून बघा' असं वेळोवेळी आवाहन करताना दिसत आहेत. पक्ष मजबूत करण्यासाठी आता स्वतः राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या सर्व गटाध्यक्षांचा मेळावा (MNS group presidents ) राज ठाकरे घेणार आहेत. रविवारी मुंबईतील गोरेगावमध्ये हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यानंतर राज ठाकरे लगेचच कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. मेळाव्यानंतर 28 तारखेला राज ठाकरे कोकण दौऱ्यावर निघतील. सहा दिवस ते कोकणात मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी करणार आहेत.

राज ठाकरे काय बोलणार? रविवारी होणाऱ्या गटाध्यक्षांचा मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील सत्ताबदल, राज्यपालांची वादग्रस्त विधानं, राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेलं वक्तव्य, हिंदुत्व या विषयावर नेमकं काय बोलतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून सध्या या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी मुंबईत येणार आहेत. या मेळाव्यात अतिउत्साही कार्यकर्त्यांचे राज ठाकरे कान टोचणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.

असा असेल राज ठाकरे यांचा कोकण दौरा: (Raj Thackerays Konkan tour) राज ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कोकण दौऱ्याची सुरुवात तळ कोकणापासून होईल. कोल्हापूर मार्गे राज ठाकरे तळ कोकणात प्रवेश करतील. त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यात प्रत्येकी दोन दिवस वेळ देऊन राज इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यावेळी अनेकांचा मनसेत प्रवेश देखील होणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या उगमस्थानात मनसे: शिवसेनेचा जन्मचं मुळात कोकणातून आणि कोकणी माणसांमुळे झाला आहे. आज देखील शिवसेनेत जितके काही पदाधिकारी खासदार, आमदार, नगरसेवक आहेत त्यातले बहुतांश हे कोकणी आहेत. याच कोकणात शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी झाल्याने मनसे याकडे एक संधी म्हणून बघत असल्याचं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे शिवसेनेच्या उगम स्थानात मनसेला खरंच पाय रोवता येतील का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.