मुंबई - केंद्र सरकार सांगते सुरू करा, तर राज्य सरकार म्हणते आम्ही नाही सुरू करणार म्हणजे राज्य सरकारला काही वेगळी अक्कल आहे का, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. किती दिवस तुम्ही थांबणार आहात, तुम्ही जिम सुरू करा, बघू पुढचे पुढं, असे आदेशच राज ठाकरे यांनी बॉडी बिल्डिंग असोसिएसनला दिला.
मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनलॉक सुरू करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून काही गोष्टी खुल्या करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने जिम उघडण्यास परवानगी दिली असताना राज्य सरकारने मात्र जिम उघडण्यास अजून परवानगी दिली नाही. यामुळे सर्व जिम व्यवसायिक आणि बॉडी बिल्डर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी मंगळवारी (11 ऑगस्ट) भेट घेतली.
टाळेबंदी सुरू झाल्यापासून जिम बंद आहेत. सरकार जिम सुरू करण्यात परवानगी देत नाही. मनसेने हा मुद्दा सरकारकडे मांडावा या मागणीसाठी भेट घेतली असल्याचे जिम व्यवसायिकांनी म्हटले. केंद्र सरकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जिम सुरू करणार आहोत. कारण जिम बंद असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे जिम व्यवसायिकांनी म्हटले आहे
'जिम सुरू करा पुढचं पुढं बघू'; राज ठाकरेंचे आदेश - राज ठाकरे बातमी
केंद्र सरकार जिम सुरू करा म्हणते तर राज्य सरकार जिम सुरू करण्यासाठी परवानगी का देत नाही, असे म्हणत राज्यातील जिम सुरू करा, बघू पुढचे पुढं, असे आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बॉडी बिल्डिंग असोसिएशनला दिले आहेत.