ETV Bharat / state

'इतकी वर्ष सडली आणि १२४ वर अडली', राज यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

भाजप-शिवसेना दोघे सरकार चालवत आहेत. शिवसेनेचे मंत्री म्हणत होते. राजीनामे देऊ. शेवटपर्यंत दिलेच नाही. पक्षप्रमुख म्हणत होते आमची इतकी वर्षे सडली आणि आता ती १२४ वर अडली, अशी टीका गोरेगावच्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

बोलताना राज ठाकरे
author img

By

Published : Oct 10, 2019, 9:24 PM IST

Updated : Oct 10, 2019, 11:28 PM IST

मुंबई - भाजप-शिवसेना दोघे सरकार चालवत आहेत. शिवसेनेचे मंत्री म्हणत होते. राजीनामे देऊ. शेवटपर्यंत दिलेच नाही. पक्षप्रमुख म्हणत होते आमची इतकी वर्षे सडली आणि आता ती १२४ वर अडली, अशी टीका गोरेगावच्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. मला सक्षम विरोधी पक्ष व्हायच आहे. इतिहासात असा कोणताही पक्ष नाही, ज्याने विरोधी पक्षाची मागणी केली, असेही यावेळी राज म्हणाले. आज (गुरूवार) मुंबईतील गोरेगाव येथे राज ठाकरे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी सेना-भाजपचा खरपूस समाचार घेतला.

बोलताना राज ठाकरे

'प्रबळ विरोधी पक्ष व्हायच आहे'
विधानसभेसाठी माझी भूमिका आहे. कोणासमोरही घरंगळत न जाणाऱ्या सक्षम विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे. कारण सध्या प्रश्न विचारणाराच कोणी नाही. तुमच्यावर अन्याय होत असेल तर त्याची विचारणा करण्यासाठी कोणी तरी हवे. माझ्या आवाक्याप्रमाणे तुमच्यासमोर म्हणणे मांडलंय. काँग्रेसचा विरोधी पक्षनेताच भाजपात जात गेला. असे म्हणत त्यांनी शिवसेनेतील इन्कमिंगवरही टीका केली. ते म्हणाले, बाळासाहेब असताना माणसे आयात करण्याची कधीच गरज पडली नव्हती. जाणाऱ्याच्या कार्यकर्त्यांनाही कळत नसेल की आपले साहेब कोणत्या पक्षात जाणार?

माझं थोबाड थांबणार नाही, इडीच्या नोटिशीवर राज ठाकरेंचा हल्लाबोल
ईडीकडून मला नोटीस पाठविण्यात आली. माझी चौकशी करण्यात आली पण, जे धमक्यांना घाबरले ते भाजपात गेले. मला फरक पडत नाही, माझ तोंड थांबणार नाही, असा हल्ला भाजपवर राज ठाकरे यांनी चढवला.

'आरे'संबंधी न्यायालयाचे सरकारशी संगनमत
आरेसंबंधी न्यायालयाचे सरकारशी संगनमत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. शनिवारी-रविवारी जवळपास 2 हजार 700 झाडांची कत्तल करण्यात आली. हे का झालं, कारण विरोध करायला कोणी नाही. आधीच्या सरकारमध्ये पर्यावरणमंत्री शिवसेनेचे रामदास कदम होते. ते ही वृक्षतोड का थांबवू शकले नाहीत ? आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, आमचे सरकार आल्यावर आम्ही आरेला जंगल घोषित करू. पण, जंगल घोषित करायला झाडे राहीलीच कुठे?, असा सवाल त्यांनी केला. प्रगतीला माझा विरोध नाही. आरेची जमीन कशाला हवी. कुलाब्याची जमीन कोणाच्या घशात घालायची आहे, असा सवाल केला होता. मेट्रोचे कारशेड तिथे करायला हवे होते. त्यासाठी आरेची जमीन घेण्याची काय गरज होती, कोण्या उद्योगपतीने सांगितले होतं का, अशी टीका त्यांनी केली.

'महाराष्ट्राला भूगोलासह इतिहासही'
रायगडाला ६०० कोटी देणार असल्याचे घोषित करण्यात आले, पण, यासाठी पैसे आहेत कुठे?, बँका डबघाईला आल्या आहेत, रोजगार नाहीत. शिवछत्रपतींच्या स्मारकाचे काय झाले? आता रायगडाला ६०० कोटी देणार, गडकिल्ले समारंभासाठी देणार. इतर राज्यांना भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहासही आहे. गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. समारंभासाठी नाही. टीव्ही आणि वृत्तपत्र तर थंड पडलीच आहेत. आता लोकही थंड पडालया लागली आहेत. जिवंत प्रेत म्हणून तुम्हाला आयुष्य जगायचे असेल तर असे आयुष्य तुम्हाला लखलाभ, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

'मुंबईतले खड्डे नव्हे विहिरी'
सव्वा लाख विहिरी बांधल्या, असे फडणवीस म्हणतात. मुंबईतील खड्ड्यांना सरकार विहिरी म्हणत असेल तर ठीक आहे, अशी टीका त्यांनी केली. सगळी शहरे कोलमडली आहेत. ठाण्यात खड्ड्यामुळे बळी पडलेल्या डॉक्टर मुलीविषयी, पुण्यात तडफडून मृत्यूमुखी पडलेल्या बसचालकाविषयी त्यांनी संवेदना व्यक्त केली.

सुरक्षा वाऱ्यावर
मीरा-भाईंदरमध्ये नायजेरियन लोक राहत आहेत. येथील महिला-मुलींना त्याचा त्रास होत आहे. शहरात खुलेआम ड्रग्स सापडत आहे. सरकार काहीच भूमिका घेत नाही. सुरक्षा वाऱ्यावर आहे. दुसऱ्या स्फोटाची वाट पाहायची का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दहीहंडी, दिवाळी सणांवर बंदी आणली जात आहे.

कशााला हवीय बुलेट ट्रेन?
आता प्रचार सुरू आहे, ३७० कलमाबात बोलले जात आहे. कलम हटविल्याचे मी स्वागतच करतो. पण, त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध, असा सवाल त्यांनी केला. काकोडकर समितीचा अहवाल आहे. १ लाख कोटी रुपयांत सर्व रेल्वे सेवा व्यवस्थित होऊ शकते. तर, जपानकडून बुलेट ट्रेनसाठी १ लाख १० हजार कोटींचे कर्ज कशाला घेतले आहे. लोकलमधून लोक लटकत असताना कशाला हवीय बुलेट ट्रेन, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

Intro:Body:

raj goregaon

Conclusion:
Last Updated : Oct 10, 2019, 11:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.