ETV Bharat / state

Raj Thackeray Appeal : सध्याच्या राजकीय परिस्थितीवरुन राज ठाकरेंचं साहित्यिकांना आवाहन; म्हणाले... - पन्नाशीची उमर गाठली

Raj Thackeray Appeal : लेखक व कवींना परमेश्वरानं शब्दांची देणगी दिलीय, त्याचा वापर करुन मराठी साहित्यिकांनी वर्तमान राजकीय परिस्थितीवर परखडपणे भाष्य करण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय. ते ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

Raj Thackeray Appeal
Raj Thackeray Appeal
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 8:15 AM IST

Updated : Sep 25, 2023, 10:40 AM IST

राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

ठाणे : Raj Thackeray Appeal : सध्याचं राजकीय वातावरण अत्यंत गढूळ झालं असून, कुठं काय घडेल याचा नेम नाही. मात्र, लेखक व कवींना परमेश्वरानं जी शब्दांची देणगी दिली आहे, त्याचा वापर करणं गरजेचं आहे. मराठी साहित्यिकांनी वर्तमान राजकीय परिस्थितीवर परखडपणे भाष्य करावं, असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात केलंय.

मंत्र्यांना वर्तमानाचं भान नाही : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचं असंग्रहीत साहित्य असलेल्या दोन पुस्तकांचं प्रकाशन ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे पार पडलं. या सोहळ्यात बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्र व देशातील राजकीय परिस्थिती तसंच मराठी भाषा व साहित्य यावर भाष्य केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असलो तरी स्वतःला राजकारणी म्हणून घेत नाही. पण सध्या जो राजकीय खेळखंडोबा सुरू आहे, त्यावर साहित्यिकांनी पुढं येऊन बोलणं अत्यंत आवश्यक आहे. कुसुमाग्रजांची कविता कठोरपणे भाष्य करणारी असून, ती राजकारण्यांना समजत नसेल तर सर्वसामान्य लोकांना तरी कळलीच पाहिजे. मात्र, मंत्र्यांना वर्तमानाचं भान नाही. यावेळी चित्रपट दिग्दर्शक अभिजित पानसे, कवी अशोक बागवे, अरुण म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

चुकणाऱ्यांना 'ती' कविता पाठवा : या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरे यांनी कुसुमाग्रज यांची गाजलेली 'पन्नाशीची उमर गाठली' कविता वाचून दाखवली. ती मंत्रालयात लावली असली तरी तिची जागा चुकली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. कुसुमाग्रजांची ही कविता प्रत्येक मराठी माणसानं रोज वाचणं आवश्यक असून जो चुकत असेल त्याला ही कविता पाठवली पाहिजे, असे सांगत त्यांनी राज्यकर्त्यांचे ठाण्यात येऊन चांगलेच कान टोचले. मराठीपणा काय आहे हे जगाला कळण्यासाठी आपलं साहित्य परकीय भाषेतदेखील भाषांतरीत होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Devendra Fadnavis News: मनसे-भाजपामधील मतभेदांना पूर्णविराम? फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी घेतलं बाप्पाचं दर्शन
  2. Jalna Maratha Protest : राज ठाकरेंचा मराठा आंदोलनाला पाठिंबा, हा अमानूष अत्याचार - मनसे
  3. CM Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्र्यांनीही घेतलं राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचं दर्शन, म्हणाले...

Last Updated : Sep 25, 2023, 10:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.