ETV Bharat / state

Raj Thackeray : '...तर गालावर वळ उठतील', मराठी महिलेला मुंबईत ऑफिससाठी जागा नाकारल्यानंतर राज ठाकरे आक्रमक

Raj Thackeray : मुंबईत एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय. त्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनाही आपल्यासोबत असंच घडल्याचं सांगितलं. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. याबाबत त्यांनी मनसैनिकांना थेट आदेशच दिलेत.

RAJ THACKERAY
राज ठाकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 1:00 PM IST

Updated : Sep 30, 2023, 9:25 AM IST

तृप्ती देवरुखकर यांची प्रतिक्रिया

मुंबई : Raj Thackeray : मराठी असल्यानं मुंबईत ऑफिससाठी जागा नाकारल्याचं समोर (Marathi Woman Denied Office Space) आलंय. एका मराठी महिलेला मुलुंडमध्ये व्यावसायिक कामासाठी जागा नाकारण्यात आली होती. आम्ही मराठी माणसांना घर/जागा देत नसल्याचं कारण पुढं करत मराठी महिलेला जागेसाठी नकार दिला होता. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक (Raj Thackeray Aggressive) होत, संबंधित नागरिकाला समज दिला होता. पंकजा मुंडे यांनाही घर नाकारण्यात आल्याचं आता समोर (Pankaja Munde House Denied) आलंय. यावरुन आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत.

  • मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने…

    — Raj Thackeray (@RajThackeray) September 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गालावर वळ उठतील : मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहिती नाहीत. त्यामुळं माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीनं दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवानं माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित, असा थेट इशाराच राज ठाकरे यांनी दिलाय. सरकारनं जरा आपला धाक दाखवला पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.

  • मराठी माणसाला महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईतच डावललं जात असेल... नाकारलं जात असेल... हिणवलं जात असेल तर एकोपा राहील कसा? एकोपा वाढेल कसा? #राजभाषा pic.twitter.com/pa5UqDzr66

    — MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज ठाकरेंचे निर्देश : मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झाला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरू राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे, असे निर्देशही राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.

गुजराती पिता-पुत्राला अटक आणि जामीन : मुलुंडमध्ये मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारणारे गुजराती पिता- पुत्र प्रविण ठक्कर आणि निलेश ठक्कर यांच्यावर मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तृप्ती देवरुखकर यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर त्यांना लगेच जामीन मिळाला. भारतीय दंड संविधान कलम ३४१, ३२३, ५०४ आणि ३४ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा -

  1. Pankaja Munde : धक्कादायक! पंकजा मुंडेंनाही मराठी असल्यानं मुंबईत घर नाकारलं, इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
  2. Refused House to Marathi Woman : मराठी असल्यानं महिलेला मुंबईत घर नाकारलं; 'मनसे'नं दाखवला इंगा

Last Updated : Sep 30, 2023, 9:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.