मुंबई - तळ कोकणात मान्सून दाखल झाल्यानंतर वेगाने वाटचाल करत असून, पावसाने महाराष्ट्र व्यापला आहे. त्यामुळे आता मान्सूनची प्रतिक्षा संपली असून, राज्यात पावसाळ्याला सुरूवात झाली आहे.
सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे खूप जास्त प्रतीक्षा न करता मान्सून महाराष्ट्रभर पसरला आहे. येत्या 5 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठावाडा आणि विदर्भमध्ये बहुतांश ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूत्ते यांनी दिली.
प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूत्ते पुढील हवामानाचा अंदाज-१५ जून - कोकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
१६ जून - कोकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
१७ जून - कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.गोवा - महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबईसाठी अंदाज15 जून - आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.