मुंबई- सकाळपासूनच येथे पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे भांडुप रेल्वे स्थानकातील ट्रॅक क्रमांक 1 व 2 वर मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. लोकल गाड्या या ट्रकवरुन सावधानता पूर्वक चालू आहेत. सध्या लोकल गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहेत.
हेही वाचा- मुंबई तुंबली, रस्ते वाहतूक कोलमडली
सकाळपासूनच मुंबईत पावसाची संततधार असल्याने भांडुप रेल्वे स्थानकातील ट्रॅक क्रमांक 1 व 2 वर मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. हवामान खात्याने येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे .यातच सकाळ पासून कोसळत असलेल्या पावसाने मुंबईतील सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. सध्या लोकल गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. भांडुप रेल्वे स्थानकातील रेल्वे ट्रॅक 1 व 2 वर मोठ्या प्रमाणात पाणी भरायला सुरुवात झाली आहे.