ETV Bharat / state

Raid On Illegal Company : भिवंडीत बेकायदा औषध कंपनीवर छापा; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल - Drug production

औषध निर्मिती (Drug production) साठवणूक व विक्री याबाबत अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) विभागाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदा औषध कंपनीवर छापा (Raid on illegal drug company ) टाकण्यात आला आहे. चालविणाऱ्या सहा जणांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली असून नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा ( Charges filed against six persons) दाखल करण्यात आला आहे.

Raid On Illegal Company
बेकायदा औषध कंपनीवर छापा
author img

By

Published : Feb 21, 2022, 6:09 PM IST

ठाणे: भिवंडीतील वळपाडा, दापोडा येथील पारसनाथ कॉम्प्लेक्स मध्ये श्वेत बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकांनी आपसात संगणमत करून अन्न व औषध प्रशासन विभागाची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या कंपनीमध्ये सायट्रिक ऍसिड सोल्युशनची साठवणूक केल्याची माहिती औषध निरीक्षक डॉ प्रशांतकुमार अस्वार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कंपनीत छापा मारला. त्यावेळी सायट्रिक ऍसिड सोल्युशनचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला. नंतर अस्वार यांनी नारपोली पोलीस ठाण्यात श्वेत बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे भागीदार राहुल देशमुख, मॅनेजर सुदाम डोळझाके , कंपनीचे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटीव्ह जिगर हरीशकुमार पंड्या, संचालक अनिता संतोष सिंग व संचालक हिरल हरीशकुमार पंड्या व दैनंदिन कामकाज पाहणारा कामगार संतोष सिंग अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास नारपोली पोलीस करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.