मुंबई - लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी शनिवारी गुढी पाडव्याच्या दिवशी बाईक रॅली काढून मतदारांना मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजाविण्याचे आव्हान केले.
यावेळी बोलताना शेवाळे म्हणाले, की मतदारांनी मतदान कुठल्याही पक्षाला करावे मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे सुदृढ लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. या संदर्भातच शेवाळेंशी बातचीत केलीय ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.