मुंबई Rahul Narvekar On MLA Disqualification : सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना खडेबोल सुनवल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी आपली भूमिका माध्यमांपुढं मांडली. कोणता विकास असंवैधानिक मानला जाईल, हे शोधून काढण्याची गरज असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेच्याबाबत राहुल नार्वेकर हे बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडणार : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकर सुनावणी न घेतल्यानं ठाकरे गटाचे आमदार सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडेबोल सुनावले आहेत. मात्र विधानसभा अध्यक्षांची भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. बेकायदेशीर काय हे निश्चित करण्यात येईल, त्यानंतरच पुढील पावले उचलता येथील, असंही राहुल नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
त्यानंतरच पुढील पावलं उचलता येथील : शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू आहे. या वादावर सुनावणी घेण्यास उशीर होत असल्यानं ठाकरे गटातील आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना चांगलचं सुनावलं आहे. मात्र राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. एकदा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर या प्रकरणातील चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर योग्य ती पावलं उचलता येतील, असंही राहुल नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- Rahul Narwekar Vs Thackeray Group : राहुल नार्वेकरांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप; म्हणाले, 'माझ्या निर्णय प्रक्रियेवर...'
- Sanjay Raut on Rahul Narvekar: आमदार अपात्रता प्रकरण रखडल्यानं संजय राऊत संतप्त.. म्हणाले राहुल नार्वेकर हे चोरांचे...
- Rahul Narwekar : आमदारांच्या अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांचं मोठं विधान; म्हणाले...