मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर, शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सुनावणीत कोणत्या प्रकारची दिरंगाई होणार नसून योग्य निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
योग्य निर्णय घेतला जाईल : आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयासंदर्भात उचित कारवाई सुरू असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. तसेच आपल्याला सर्वांना माहीत आहे की, ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेत असतात तेव्हा ते ज्युडिशियल अधिकारी म्हणून काम करत असतात. याचे मला भान देखील आहे. त्यामुळे यासंदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कारवाई आपण करणार असल्याचे ते म्हणाले. सुनावणी कधीपर्यंत होऊन निर्णय होऊ शकतो या प्रश्नाला राहुल नार्वेकर म्हणाले की, सुनावणी करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याबाबत आश्वासन देतो. तसेच योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.
विधिमंडळाला शासनाकडून निधीची तरतूद : उदयपूरमध्ये झालेल्या परिषदेत पीठासीन अधिकाऱ्यांची बैठक होती. त्यामध्ये मी प्रत्येक विधिमंडळात एक वेगळी राजशिष्टाचाराची शाखा निर्माण करण्यात यावी आणि प्रत्येक विधिमंडळाला शासनाकडून निधीची तरतूद उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली. त्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. पुढची कारवाई करण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. तसेच या बैठकीत विधिमंडळातील कामकाज सुरळीत कसे चालवावे यावर सकारात्मक चर्चा झाली. देशातील ३१ राज्यांमधील पीठासीन अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. प्रत्येकाने आपले सल्ले आणि मते सरदरच्या बैठकीमध्ये मांडली. लोकशाही आधीच कशा प्रकारे बळकट करता येईल यावर चर्चा बैठकीत झाली.
चंद्रयान मोहिमेसाठी शुभेच्छा : सर्व भारतवासीयांना अत्यंत अभिमान वाटेल असे चंद्रयान मिशन भारताने हाती घेतले आहे. देशातील सर्व भारतीयांना आणि शास्त्रज्ञांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यासोबत ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की, चंद्रयान मोहीम यशस्वीपणे पार पडू देत. त्यामुळे भारताला एक आधुनिक विक्रम करण्याची संधी प्राप्त होवो. असे राहुल नार्वेकर म्हणाले.
हेही वाचा -
- SC Notice To Assembly Speaker : सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास भाग पाडू शकत नाही - नार्वेकर
- MLAs Disqualification Hearing : 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय?
- Maharashtra Political Crisis : राहुल नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये... शिंदे गटाच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस