मुंबई: शीना बोरा हत्याकांड प्रकरणात शीनाचा प्रियकर राहुल मुखर्जी या प्रकरणात मुख्य साक्षीदार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विषेश सीबीआय समोर साक्ष देण्याकरिता तो शुक्रवारी हजर झाला होता. यावेळी राहुलने शीना बोरा आणि त्याच्या प्रेमसंबंधात बाबत न्यायालयासमोर अनेक खुलासे केले. तसेच इंद्रायणी आणि शीना बोरा यांच्याबद्दल देखील अनेक धक्कादायक खुलासे राहुल मुखर्जी ने न्यायालयासमोर केले आहेत.
परमबीर सिंह यांनी मला शीना बेपत्ता असल्याची तक्रार करण्यास सांगितले होते. परंतु पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घेतली नाही. परमबीर माझ्या आईचे चांगले मित्र आहेत. त्यांनी तक्रार नोंदवण्यास मदत केली नाही. 2 मे 2012 रोजी रायगड जिल्ह्यातल्या जंगलात शीनाचा मृतदेह सापडला होता. त्यावेळी परमबीर कोकण विभागाचे महासंचालक होते. 24 एप्रिल 2012 रोजी शीनाची हत्या करण्यात आली. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती.
इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली. त्यांच्याच मदतीने 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आले. इंद्राणीने वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठले. पोलिसांनी इंद्राणीसोबत संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला. इंद्राणी मुखर्जीला साडेसहा वर्षानंतर मे महिन्यात जामीन मंजूर झाला. शीनाचा मृतदेह हा रायगड जिल्ह्यात सापडला. तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे वादग्रस्त अधिकारी परमबीर यांच्या बाबत हा जबाब पुढे आल्याने त्यांच्या अडचणीत वाढू शकतात.
इंद्राणीने तीन लग्न केली. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचे नाव शीना बोरा होते. इंद्राणीचा तिसरा नवरा पीटरचा राहुल हा मुलगा त्याचे आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितले जाते. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कार मध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.
2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद होती.