मुंबई Rahul Gandhi PC : देशातील अनेक समस्या आणि उद्योगपती अदानी बाबत प्रश्न घेऊन काँग्रेसने कॅम्पेनिंग केलं. त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 100 प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, यावर पंतप्रधानांनी मौन बाळगलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांचं नातं काय याला लक्ष्य करत आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस खासदार जयराम रमेश यांनी दिली. (PM Narendra Modi) (Industrialist Adani) (Rahul Gandhi PC Today) (G 20 Summit) (Congress 100 Questions to PM Modi) (Rahul Gandhi PC On Modi Adani)
काय म्हणाले जयराम रमेश (Jayram Ramesh) : नोव्हेंबर 2014 साली ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात नववं जी 20 शिखर संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. त्यावेळेस ते म्हणाले होते की काळा पैसा विरोधात, काळा पैसे गोळा करणारे, मनी लॉन्ड्रिंग, काळा पैसा पांढरा करणारे यांच्या विरोधात जी 20 परिषदेमध्ये सर्वांनी सहयोग करावा. तसंच याच्या विरोधात नेतृत्व करणं गरजेचं असल्याचं स्पष्ट केलं. पुढील आठवड्यात दिल्लीत 18 वी जी 20 शिखर संमेलन परिषद भरणार आहे. आज जगातील सर्वच वृत्तपत्रांमध्ये खुलासा करण्यात आला आहे की, नरेंद्र मोदी यांचे मित्र उद्योगपती अदानी यांनी कशाप्रकारे 'शेल' (बोगस) कंपन्यांचा उपयोग करून, सेबीच्या सर्व नियमांचं उल्लंघन कशाप्रकारे केलं आहे. हा सर्व खुलासा आज सर्व वृत्तपत्रांमध्ये आला आहे. या सर्व संदर्भात मी जास्त बोलू इच्छित नाही; मात्र पाच वाजेच्या दरम्यान आमचे नेते राहुल गांधी यावर भाष्य करतील, असं जयराम नरेश म्हणाले.
दोन महिन्यात 100 प्रश्न विचारले : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसकडून 28 जानेवारी ते 28 मार्च या दोन महिन्यात 100 प्रश्न विचारले होते. हम अदानी के हैं कोन? दररोज आम्ही अशा प्रकारचे तीन प्रश्न घेत होतो. आम्ही पंतप्रधानांना म्हणालो की, मौन तोडा. शेल कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला, कायद्याचं उल्लंघन केलं गेलं आहे. वीस हजार कोटी रुपये अदानी यांच्या शेल कंपनीमध्ये मिळाले आहे, याचा खरा मालक कोण आहे? याविषयी कोणतीही माहिती समोर येत नाही. या सर्व संदर्भात काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी यांना शंभर प्रश्न विचारले गेले. राहुल गांधी यांनी संसदेत 7 फेब्रुवारीला भाषण केलं होतं. त्यानंतर त्यांची 20 दिवसानंतर लोकसभेची खासदारकी रद्द करण्यात आली. हा अदानी यांच्याशी निगडीत प्रश्न असल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांच्यात कोणतं नातं आहे, हा मुख्य मुद्दा असल्याचंही ते म्हणाले.
हेही वाचा: