ETV Bharat / state

आता मुंबईत धावतेय 'क्युट' रिक्षा

रिक्षा म्हटलं की सर्वासमोर उभी राहते ती तीन चाके असलेली काळी पिवळी रिक्षा. पण, स्मार्ट फोनच्या या युगात नागरिकांसह वाहने आता स्मार्ट होत चालली आहेत. होय तुम्ही जे वाचताय ते खर आहे. कारण, मुंबईत आता तीन चाकी रिक्षासोबतच चार चाकी रिक्षाही धावू लागली आहे.

author img

By

Published : Jul 20, 2019, 4:47 PM IST

'क्युट' रिक्षा

मुंबई - रिक्षा म्हटलं की सर्वासमोर उभी राहते ती तीन चाके असलेली काळी पिवळी रिक्षा. पण, स्मार्ट फोनच्या या युगात नागरिकांसह वाहने आता स्मार्ट होत चालली आहेत. होय तुम्ही जे वाचताय ते खर आहे. कारण, मुंबईत आता तीन चाकी रिक्षासोबतच चार चाकी रिक्षाही धावू लागली आहे.

रिक्षा बनविणाऱ्या बजाज कंपनीने क्युट नावाची चारचाकी रिक्षा बाजारात आणली आहे. यामुळे रिक्षाचेही रूपडे आता 'क्युट' दिसू लागले आहेत. यामध्येही रिक्षाप्रमाणे ३ प्रवासी आणि एक चालक बसू शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने ही रिक्षा तिनचाकीपेक्षाही सुरक्षित आहे. कारण, यामध्ये प्रवाशांसाठी सिट बेल्ट्स देण्यात आले असून चालकाची सिटही चारचाकी प्रमाणे अॅडजेस्ट होते. चार चाके असल्यामुळे ही रिक्षा हाताळ्यासही सोपी आहे. बजाज कंपनीच्या क्युट या चारचाकी रिक्षाला परिवहन विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये चार चाकी रिक्षा रस्त्यावर धावताना पाहण्यास मिळत आहेत.

तीनचाकी रिक्षातून पावळ्यात प्रवास करताना प्रवाशांना काही वेळा भिजत प्रवास करावा लागतो. पण, या चारचाकी रिक्षामुळे पावसाळ्यातही प्रवास करताना पावसाच्या पाण्यापासून प्रवाशांचा बचाव होतो. रिक्षाप्रमाणे याची लांबी रूंदी लहान असल्याने ही वर्दळीच्या रस्त्यातही ही गाडी सहज निघू शकते.

या चार चाकी रिक्षात तीन प्रवाशी आरामशीर बसू शकतात प्रवाशांना रिक्षात बसताना सुरक्षा पट्टा (सीटबेल्ट) लावणे बंधनकारक आहे. महिला व लहान मुलांच्या सुरक्षेसाठी गाडी थांवण्यासाठी एक बटन देण्यात आले आहे. त्यामुळे रिक्षा निश्चित जागेच्या पुढे जात आहे, असे प्रवाशांना वाटल्यास ते या बटनचा वापर करू शकतात. आपले सामान ठेवण्यासाठी रिक्षाच्या समोर जागा देण्यात आली आहे.

मुंबई उपनगरात सध्या वेगवेगळ्या कंपन्यांचे तीन चाकी रिक्षा धावतात प्रवाशांना आपल्या निश्चित स्थळी जाण्यासाठी मीटरचा वापर करून या रिक्षा निश्चित स्थळी सोडतात. पण, आता याच रिक्षांच्या जागी चार चाकी रिक्षाने पाऊल टाकले आहे. ही रिक्षा सीएनजी, पेट्रोल व डिझेल अशा तीनही इंधन पर्यायामध्ये उपलब्ध आहे. तीन चाकी रिक्षामुळे प्रवाशांना अपघातावेळी बाहेर फेकले जाण्याची भीती असल्याने एका बाजूला लोखंडी पट्टी टाकण्याची परिवहन विभागाने सक्ती केली आहे. पण, आता या नवीन चारचाकी क्युट रिक्षाला रिक्षाला दारे असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेला वाव मिळणार आहे.

सध्या या रिक्षाचे भाडे तीन चाकी ऑटोरिक्षांप्रमाणे आकारले जात आहे, असे या रिक्षाचे मालक नितीन भालेकर यांनी सांगितले. ही रिक्षा चालवण्यासाठी चारचाकी सारखीच सोय देण्यात आली आहे. टॅक्सी सारखे मीटर या रिक्षात बसवण्यात आले आहे.

Intro:मुंबईत तीन चाकी रिक्षाचे रुपडं बदलल आता चार चाकी रिक्षा रस्त्यावर

आता मुंबई उपनगरात व आसपासच्या परिसरात तीन चाकी रिक्षा ही चार
चाकी रिक्षा प्रमाणे रस्त्यावर धावल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण ही चार चाकी कार नसून रिक्षाच आहेBody:मुंबईत तीन चाकी रिक्षाचे रुपडं बदलल आता चार चाकी रिक्षा रस्त्यावर

आता मुंबई उपनगरात व आसपासच्या परिसरात तीन चाकी रिक्षा ही चार
चाकी रिक्षा प्रमाणे रस्त्यावर धावल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण ही चार चाकी कार नसून रिक्षाच आहे .

बजाज कंपनीच्या क्युट या चार चाकी रिक्षा ला परिवहन विभागाने मान्यता दिली आहे.त्यामुळे आता मुंबईमध्ये चार चाकी रिक्षा रस्त्यावर धावताना पाहण्यास मिळत आहेत . यामुळे आता रिक्षाचा रुपडं बदलला आहे.

या चार चाकी रिक्षात 3 प्रवाशी आरामशीर बसू शकतात प्रवाश्यांना रिक्षात बसते वेळी सुरक्षा पट्टा लावणे बंधनकारक आहे. महिला व लहान मुलांना सुरक्षा नियंत्रण साठी गाडी थांवण्यासाठी एक बटन देण्यात आले आहे. त्यामुळे रिक्षा निश्चित जागेच्या पुढे जात आहे असे प्रवाश्यांना वाटले तर ते या बटनचा वापर करू शकतात. आपले सामान ठेवण्यासाठी रिक्षाच्या समोर बंददार दिले यामुळे आपले साहित्य आपल्या समोर असणार आहे.

आणि ही बदलत्या रिक्षाने आता अधिक सुरक्षित प्रवास प्रवाश्यांना करता येण्यासारखा आहे. मुंबई उपनगरात सध्या वेगवेगळ्या कंपन्यांचे तीन चाकी रिक्षा धावतात प्रवाशांना आपल्या निश्चित स्थळी जाण्यासाठी मीटरचा वापर करून या रिक्षा निश्चित स्थळी सोडतात पण आता याच रिक्षा च्या जागी चार चाकी रिक्षाने पाऊल टाकले आहे. महत्त्वाचं म्हणजे ही रिक्षा सीएनजी,पेट्रोल, व डिझेल वर चालणारी आहे. बजाज कंपनीने आपली क्युट कार लाँच केली आहे.तिलाच चार चाकी रिक्षा असे परिवहन विभागाने मान्यता दिली आहे. तीन चाकी रिक्षा मुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची भीती असल्याने एका बाजूला लोखंडी पट्टी टाकण्याची परिवहन विभागाने सक्ती केली आहे. पण आता या नवीन चार चाकी क्युट रिक्षाला रिक्षाला टॅप टणक असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेला वाव मिळणार आहे.सध्या या रिक्षाचे भाडे तीन चाकी ऑटोरिक्षां प्रमाणे आकारले जाणार आहे. असे या रिक्शाचे मालक नितीन भालेकर यांनी सांगितले.या रिक्षाला चालवण्यासाठी पायात ब्रेक, कॅलच,एक्सलिटर देण्यात आली आहे.हातात गियर, व छोट्या आकाराची स्टेरिंग देण्यात आली आहे. टॅक्सी सारखेच मीटर रिक्षाच्या आत बसवण्यात आले आहे.

या रिक्षातून प्रवास करणारे नितीन कदम म्हणाले या रिक्षात बसल्याने खरच एखादी टॅक्सीत बसल्या सारखं सुरक्षित वाटत आहे .रिक्षावाला नको त्या ठिकाणी पुढे जात असेल तर आमच्या हातामध्ये रिक्षा थांवण्यासाठी बटन आहे. त्यामुळे पुढे जाण्याचा धोका कमी होण्याची शक्यता आहे आणि सर्वसामान्यांना परवडणारी आहे का तर या रीक्षा चे भाडे तीन चाकी रिक्षा सारखेच असल्याने खरोखरच या अशा रिक्षांचे प्रमाण वाढले पाहिजे .

दीपक चौरसिया (प्रवाशी) म्हणाले की या चार चाकी रिक्षा मुळे लहान मुले जोराच्या वेगात रिक्षा चालू असताना किंवा ब्रेक दाबल्यानं बाहेर पडण्याचा धोका कमी आहे व पाऊस आणि ऊन यामुळे या रिक्षावर चांगल्या प्रकारे टप असल्यामुळे पावसात भिजन्याचा कमी शक्यता आहे. या रिक्षात बसून खरंच आनंद होत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.