ETV Bharat / state

मुंबईत दिव्यांग मतदारांसाठी 'पीडब्ल्यूडी' अॅप, व्हिलचेअरसाठी २२०० मतदारांची नोंदणी

मुंबईत चौथ्या टप्प्यात मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हिलचेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग आदी सुविधा असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी मुक्कादम यांनी दिली.

author img

By

Published : Apr 25, 2019, 7:57 PM IST

उपजिल्हाधिकारी फरोघ मुक्कादम

मुंबई - दिव्यांग मतदारांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी ‘पीडब्ल्यूडी’ हे नवीन अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपवर मतदान केंद्रांच्या माहितीपासून व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध होणार आहे. दिव्यांगांना निवडणूक आयोगाने यंदा दिव्यांग मतदारांसाठी ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य तयार केले आहे. त्यातच मुंबईतही दिव्यांग मतदारांनी या अॅपद्वारे मोठ्या प्रमाणात व्हिलचेरसाठी नोंद केली असल्याचे उपजिल्हाधिकारी फरोघ मुक्कादम यांनी सांगितले.

उपजिल्हाधिकारी फरोघ मुक्कादम

राज्यात यंदा दिव्यांग मतदारांची संख्या २ लाख २४ हजार १६२ इतकी आहे. यामध्ये अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले ३७ हजार ३२४, मूकबधीर २४ हजार ७७, शारीरिक अपंगत्व असलेले १ लाख ८ हजार २२, तर इतर अक्षमता असलेले ५४ हजार ३९ दिव्यांग मतदार आहेत. त्याचप्रमाणे फक्त मुंबईतील ३ हजार दिव्यांग मतदारांपैकी २ हजार २०० दिव्यांगानी या अॅपमध्ये आपल्याला मतदान करण्यासाठी यायला वाहतुक सुविधा असावी यासाठी नोंद केली आहे. मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने यंदा हा पुढाकार घेतला आहे.

अपंगांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरवण्यात याव्यात, असे निर्देश निवडणूक आयोगामार्फत सर्व जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत. आयोगाचे आदेश पाळत दिव्यांगांना सुविधा देण्यासाठी मुंबई जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावर सुकाणू समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुंबईत चौथ्या टप्प्यात मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हिलचेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग आदी सुविधा असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी मुक्कादम यांनी दिली.

Intro:

मुंबईत बावीसशे दिव्यांग मतदारांनी पीडब्ल्यूडी अँपद्वारे मतदानकरण्यासाठी व्हीलचेरची केली नोंद

मुंबईतील दिव्यांग मतदारांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणे अधिक सोयीचे होणार आहे. कारण दिव्यांगांना मतदानासाठी विविध सुविधा देण्याबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा त्यांच्यासाठी ‘पीडब्ल्यूडी’ हे नवीन मोबाईल ऍप विकसित केले आहे. या ऍपवर मतदान केंद्रांच्या माहितीपासून व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध होणार आहे. दिव्यांगांना निवडणूक आयोगाने यंदा दिव्यांग मतदारांसाठी ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य तयार केले आहे.त्यातच मुंबईतही दिव्यांग मतदारांनी या अँपद्वारे मोठ्या प्रमाणात व्हीलचेरसाठी नोंद केली आहे असं उपजिल्हाधिकारी फरोघ मुक्कादम यांनी सांगितले.

राज्यात यंदा दिव्यांग मतदारांची संख्या 2 लाख 24 हजार 162 इतकी आहे. यात अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले 37 हजार 324, मूकबधिर 24 हजार 77, शारीरिक अपंगत्व असलेले 1 लाख 8 हजार 22 तर इतर अक्षमता असलेले 54 हजार 39 दिव्यांग मतदार आहेत.त्याचप्रमाणे फक्त मुंबईत 3000 दिव्यांग मतदारांपैकी 2200 दिव्यांगाणीं या अँप मध्ये आपल्याला मतदान करण्यासाठी यायला वाहतुक सुविधा असावी यासाठी नोंद केली आहे.मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने यंदा हा पुढाकार घेतला आहे.

अपंगांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश निवडणूक आयोगामार्फत सर्व जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत.त्याचे आदेश पाळत दिव्यांगांना सुविधा देण्यासाठी मुंबई जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावर सुकाणू समित्या स्थापन करण्यात आल्यात त्यानुसार. मुंबईत चौथ्या टप्प्यात दिव्यांग मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हीलचेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग आदी सुविधा असणार आहेत असे उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.