ETV Bharat / state

अल्पवयीन पीडिता आणि बलात्काऱ्याची एकत्रित धिंड, उर्मिला मातोंडकर भडकली - मध्य प्रदेश क्राईम न्यूज

ही धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पीडिता आणि आरोपीला एका दोरीने बांधून त्यांची धिंड काढताना दिसत आहे. काही लोकं ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत होते . या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेची जमावापासून सुटका केली.

शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर
शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर
author img

By

Published : Mar 30, 2021, 1:28 PM IST

Updated : Mar 30, 2021, 2:03 PM IST

मुंबई - मध्यप्रदेशमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबतच दोरीने बांधून धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धिंडला तिच्या घरच्यांचादेखील पाठींबा होता. कुटुंबीयांनीच तिला आरोपीसोबत चालायला भाग पाडले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरांचे संतापजनक ट्विट

शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकराचे संतापजनक ट्विट
या घटनेबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. मध्य प्रदेशमध्ये १६ वर्षांच्या बलात्कार पीडितेला तिच्यावर बलात्कार करणाऱ्यासोबतच दोरीने बांधून जाहीर मिरवणूक काढण्यात आली. हा सर्व अत्याचार सुरु असताना ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या जात होत्या? आपण (समाज म्हणून) इथपर्यंत कसे आलो? हे कृत्य अमानवीय आहे”, अशा आशयाचे ट्विट करत उर्मिला यांनी केले आहे.

आरोपीसोबत पीडितेच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल
ही धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पीडिता आणि आरोपीला एका दोरीने बांधून त्यांची धिंड काढताना दिसत आहे. काही लोकं असून ते ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत आहेत. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पीडितेची जमावापासून सूटका केली. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात मध्य प्रदेश पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. धिंड काढणाऱ्या पाच जणांना देखील अटक करण्यात आली आहे. या घटनेत पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. बलात्काराचा आरोप असलेल्या २१ वर्षीय व्यक्तीविरोधात पहिला तर दुसरा गुन्हा पीडितेच्या नातेवाईकांविरोधात आणि गावकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- 'बर्थडे बॉय'सह १० जणांवर गुन्हा; कोरोना काळात आदेशाचे उल्लंघन

Last Updated : Mar 30, 2021, 2:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.