ETV Bharat / state

धक्कादायक.. चेंबूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या - chembur police station

मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पोलीस दिवस-रात्र रस्त्यावर संचारबंदीत कार्यरत आहेत. तर दुसरीकडे चेंबूर पोलीस ठाण्यात एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे या उपनिरीक्षकाच्या सेवानिवृत्तीस केवळ एक महिना शिल्लक होता.

psi suicide in chembur police station mumbai
पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Mar 30, 2020, 4:20 PM IST

मुंबई - शहर व उपनगरात एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पोलीस दिवस-रात्र रस्त्यावर संचारबंदीत कार्यरत आहेत.तर दुसरीकडे चेंबूर पोलीस ठाण्यात एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. संपत दत्तात्रय गाढवे (वय ५८) असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे.

पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
मृत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत गाढवे यांना सेवा निवृत्तीला अवघा एक महिना शिल्लक होता. गाढवे हे गेल्या काही वर्षांपासून कर्क रोगाने त्रस्त होते. त्यांचे गेल्या वर्षी एक ऑपरेशन देखील झाले होते.मात्र हा त्रास त्यांचा थांबला नव्हता.आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास चेंबूर पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी गस्तीवर असताना पोलीस ठाण्याच्या स्टोअर रूममध्ये त्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात कर्क रोगामुळे त्रस्त असल्याचे म्हटले आहे. चेंबूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन साठी पाठविला असून पुढील तपास चेंबूर पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.