मुंबई - कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मनसेचे महापालिका युनियनचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयाला भेट दिली. कामगारांना दररोज मिळणाऱ्या असुविधांबाबत प्रशासनाला धारेवर धरत देशपांडे यांनी अग्रवाल रुग्णालय प्रशासनाला सुखसुविधा पुरविण्यात तत्काळ सुधारणा करा, असे बजावले. तसेच महापालिका कर्मचारी करोनाबाधित झाल्यास, त्यांच्यासाठी तातडीने स्वतंत्र व्यवस्था किंवा विशेष कक्ष तयार करण्यात यावा, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली.
कोरोनाच्या महामारीत अहोरात्र झटत असलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना योग्य सुखसुविधा मिळत नसल्याने त्यांच्या जीवन मरण्याचा प्रश्न उद्भवला आहे. त्यासाठीच, मुलुंड पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात चाललेल्या सुविधांच्या अभावामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रुग्णालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मनसेचे महापालिका युनियनचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयाला भेट दिली. कामगारांना दररोज मिळणाऱ्या असुविधांबाबत प्रशासनाला धारेवर धरत देशपांडे यांनी अग्रवाल रुग्णालय प्रशासनाला सुखसुविधा पुरविण्यात तातडीने सुधारणा करा, असे बजावले. तसेच महापालिका कर्मचारी करोनाबाधित झाल्यास, त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था किंवा विशेष कक्ष तयार करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
काही दिवसांपूर्वी रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. योग्य सुविधा रुग्णालयातर्फे न दिल्यामुळे त्यांना कोरोना झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत याप्रकरणी देशपांडे यांनी जाब विचारला. यावेळी मनसे युनियनने केलेल्या मागण्या प्रशासनाकडून एका आठवड्यात पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन अग्रवाल रुग्णालय प्रशासनाने दिले असल्याचे देशपांडे यांनी सांगितले .