ETV Bharat / state

वृक्ष प्राधिकरणात 3 हजार 537 झाडे तोडण्याचे प्रस्ताव, कोस्टल रोडसाठी 373 झाडांची होणार कत्तल - मुंबई शिवसेना बातमी

शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडसाठीही 373 झाडे तोडण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.  यामुळे उद्या होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत शिवसेना आणि भाजपा काय भूमिका घेते याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

BMC
बृहन्मुंबई महापालिका
author img

By

Published : Oct 22, 2020, 11:06 PM IST

मुंबई - मुंबईमधील विकास कामांमध्ये अडथळा ठरणारी सुमारे 3 हजार 537 झाडे तोडण्याचे प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीत प्रशासनाकडून सादर करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये झाडे तोडण्याला पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा विरोध आहे. यामुळे पालिका आयुक्तांनी भाजपाला हाताशी धरुन आरेमधील 2 हजार 700 झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यावरून प्रचंड वाद झाला होता. उद्या (दि. 23 ऑक्टोबर) होणाऱ्या वृक्ष प्राधिकरण बैठकीत शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडसाठीही 373 झाडे तोडण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. यामुळे उद्या होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत शिवसेना आणि भाजपा काय भूमिका घेते याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत लोकसंख्येच्या प्रमाणात झाडांचे प्रमाण कमी आहे. मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 30 लाखांहून अधिक आहे. तर झाडांची संख्या अवघी 29 लाख इतकी आहे. यामुळे मुंबईत शुद्ध हवेची आणि प्रदूषणाची नेहमीच तक्रार असते. यामुळे मुंबईत झाडे तोडू नयेत अशी अनेक संघटनांची मागणी असते. मात्र, त्यानंतरही सरकारी कामात अडथळे ठरणारी विकास कामात अडथळे ठरणारी झाडे तोडली जातात किंवा इतर ठिकाणी पुनर्रोपित केली जातात. त्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी आवश्यक असते. पालिका आयुक्त अध्यक्ष असलेल्या समितीपुढे झाडे तोडणे आणि पुनर्रोपित करण्याचे प्रस्ताव मंजूर केले जातात.

पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत सुमारे 3 हजार 537 झाडे तोडण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यात सत्ताधारी शिवसेना व मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या कामात अडथळा ठरणारी 373, महालक्ष्मी स्पोर्टस ग्राऊंड येथील तरण तलावात अडथळा ठरणारी 16, भांडुप येथील रेल्वेवरील नाला रुंदीकरणात अडथळा ठरणारी 115, वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्बांधकामात अडथळा ठरणारी 625 झाडे कापण्याचे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत झाडे तोडणे आणि पुनर्रोपित करण्याचे एकूण 22 प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित प्रस्ताव असल्याचे वृक्ष प्राधिकरणातील अधिकाऱ्याने सांगितले. बैठकीत 1 हजार 900 झाडे पुन्हा लावण्याचेही प्रस्ताव असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्याने मागील वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक रद्द करण्यात आली होती. त्यावेळी 2 हजार 537 झाडे तोडण्याचे प्रस्ताव होते. आत या महिन्यात त्यात आणखी 830 झाडे तोडण्याचे प्रस्ताव आल्याने झाडे तोडण्याची संख्या 3 हजार 537 वर गेली आहे. आरेमधील झाडे तोडताना शिवसेनेने विरोध केला होता. पालिका आयुक्तांनी त्यावेळी भाजपला हाताशी धरून आरेमधील झाडे तोडण्याचे प्रस्ताव मंजूर केले होते. यामुळे उद्याच्या बैठकीत शिवसेना आणि भाजप काय भूमिका घेते याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - खडसेंच्या प्रवेशाची जय्यत तयारी; राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.