ETV Bharat / state

प्रा.बाळ आपटे अभ्यास केंद्र आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून ओळखले जाईल  - राज्यपाल - सी. विद्यासागर राव

विद्यानगरी परिसरात नव्याने तयार होणाऱ्या 'प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटर'च्या कोनशिलेचे अनावरण आज राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी,  'तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून आगामी काळात प्राध्यापक बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल' असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला आहे.

प्रा.बाळ आपटे अभ्यास केंद्र आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून ओळखले जाईल  - राज्यपाल
author img

By

Published : Aug 19, 2019, 8:41 PM IST

मुंबई - विद्यानगरी परिसरात नव्याने तयार होणाऱ्या 'प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटर'च्या कोनशिलेचे अनावरण आज राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी, 'तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून आगामी काळात प्राध्यापक बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल' असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला आहे.

प्रा.बाळ आपटे अभ्यास केंद्र आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून ओळखले जाईल - राज्यपाल

राज्यपाल यावेळी म्हणाले की, या केंद्रातील विद्यार्थ्यांमधून आदीवासी विकास, ग्रामविकास, आरोग्य, पाणी, शिक्षण अशा विविध विषयांत काम करणारे सामाजिक नेते तयार होतील. मानवी इतिहासाचा मार्ग बदलणार्‍या सामाजिक चळवळींसाठी बाळ आपटे सेंटर ‘युवाशक्ती’ म्हणून ओळखले जाईल.

अभ्यास केंद्राचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, आदी उपस्थित होते.

Intro:तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून प्रा. बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल  - राज्यपाल

mh-mum-01-balaapte-center-program-university-vhij-7201153

मुंबई, ता. 19 :
 विद्यार्थी तसेच युवक-युवतींच्या चळवळींबद्दल तसेच जगामध्ये शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपले स्वतःचे समर्पित अभ्यास केंद्र असणे ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी चळवळ आणि तरूणांसाठी तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून आगामी काळात प्राध्यापक बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने मुंबई विद्यापीठात साकारत असलेल्या प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटरचे आज मान्यवरांच्या हस्ते कोनशिला व भूमीपूजन करण्यात आले. विद्यानगरी परिसरात नव्याने तयार होणाऱ्या या केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण आज मा. राज्यपाल श्सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले तर इमारतीचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मा. दत्तात्रय होसबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार, अभाविप चे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनिल आंबेकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील मा. कुलगुरू, प्र.कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल यावेळी म्हणाले की, आधुनिक चळवळींमध्ये जागतिक स्तरावर लोकांना एकत्रीत करण्यासाठी तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा वापर होतो. संप्रेषण काळ म्हणजेच कम्युनिकेशन ट्रेंडशी जुळवून घेणे हा यशस्वी चळवळीचा पाया आहे.  आजचा विद्यार्थी हा उद्याचा नाही तर आजचा नागरिक आहे या मांडणीवर दृढ विश्वास ठेऊन त्यांच्याशी निगडीत विषयांची तर्कशुद्ध मांडणी करणे या केंद्राच्या माध्यमातून केले जाणार आहे. या केंद्रातील विद्यार्थ्यांमधून आदीवासी विकास, ग्रामविकास, आरोग्य, पाणी, शिक्षण अशा विविध विषयांत काम करणारे सामाजिक नेते तयार होतील.. मानवी इतिहासाचा मार्ग बदलणार्‍या शक्तिशाली सामाजिक चळवळींसाठी बाळ आपटे सेंटर ‘युवाशक्ती’ म्हणून ओळखले जाईल असेही राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी यावेळी प्रा. बाळ आपटे यांच्या स्मृतीना उजाळा देत विद्यार्थी चळवळीच्या जडणघडणीतील त्यांचे योगदान विशद केले. विद्यार्थी चळवळीचे तत्वज्ञान विकसीत करण्यात प्रा. बाळ आपटे यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. आपटे यांनी जगभरातील विद्यार्थी चळवळींचा अभ्यास केल्यामुळे विद्यार्थी चळवळीचा दृष्टिकोन व्यापक असण्यावर त्यांनी कायम भर दिला. राष्ट्रीय युवा धोरणात सर्वसमावेशक बाबींचा अंतर्भाव होण्यासाठी त्यांची आग्रही भूमिका होती. त्यांनी विद्यार्थी चळवळीची तर्कशुद्ध मांडणी केल्यामुळे त्यांच्यानावे विद्यापीठात सुरू होणाऱ्या या केंद्राच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संशोधन केले जाणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की,  प्रा. आपटे एक उत्तम व्यक्ती, उत्तम विचारवंत होते. तरुण विद्यार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी तसेच,या विद्यार्थ्यांना समाजात बदल घडवून आणण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी या केंद्राची स्थापना केली गेली आहे. तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांनी या केंद्रातील शैक्षणिक उपक्रमांमधून समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत भरीव योगदान देतील असे सशक्त युवा पदवीधर, संशोधक आणि नेतृत्त तयार होईल असा विश्वास व्यक्त केला.  तर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यावेळी म्हणाले की, बाळ आपटे आणि माझी महाविदयालयात शिक्षण घेत असल्यापासूनची मैत्री होती. एक चांगला मित्र कसा असावा हे मी बाळ आपटे यांच्याकडूनच शिकलो. विदयार्थी आणि युवकांना दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कार्यकाळात केला आणि हेच त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. असेही जोशी म्हणाले. Body:तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून प्रा. बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल  - राज्यपाल
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.