ETV Bharat / state

Pathan Movie : पठाण चित्रपटाला देशातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट ठरवण्याचा निर्मात्यांचा मानस - अ‍ॅक्शनपट

शाहरुख खान (Shah Rukh Khan) तब्बल चार वर्षांच्या गॅपनंतर 'पठाण' मधून मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. पठाण (Pathan Movie) चित्रपटाला देशातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट ठरवण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

Pathan
पठाण चित्रपटाला देशातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट ठरवण्याचा निर्मात्यांचा मानस
author img

By

Published : Nov 28, 2022, 10:44 PM IST

मुंबई : एकापाठोपाठ एक सिनेमे पडल्यावर शाहरुख खानने (Shah Rukh Khan) अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता शाहरुख खान तब्बल चार वर्षांच्या गॅपनंतर 'पठाण' (Pathan Movie) मधून मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. हा एक थक्क करायला लावणाऱ्या अ‍ॅक्शनने परिपूर्ण असा चित्रपट असून त्यात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आतापर्यंत कधीही न दिसलेल्या रूपात दिसणार आहे, तर शाहरुख जॉन अब्राहमच्या विरोधात उभा ठाकलेला दिसणार असून चांगल्या आणि वाईटाचा थरारक संघर्ष यातून दिसेल.

हल्ली निर्माते आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निरनिराळे फंडे वापरताना दिसत आहेत. अर्थातच चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढावी हा त्यांचा प्रयत्न असतो. आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद पठाण सिनेमा देशातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट ठरावा म्हणून पूर्ण प्रयत्न करत आहेत. पठाणचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी सांगितलं की, आम्ही सिनेमाचा थिएट्रिकल ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी गाणी प्रदर्शित करणार आहोत. ट्रेलरआधी गाणी प्रदर्शित करून पठाणच्या कथेची उत्सुकता त्याद्वारे वाढवत नेणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

यश राज फिल्म्सचा (Yash Raj Films) हा नेत्रसुखद अ‍ॅक्शनपट पठाण आदित्य चोप्रा यांच्या महत्त्वाकांक्षी स्पाय युनिव्हर्सचा भाग असून त्यात शाहरूख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम असे देशातील सर्वात मोठे सुपरस्टार्स काम करत आहेत. इंटरनेटवर पठाणचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी अक्षरशः तो डोक्यावर घेतला होता. पठाणची उत्सुकता वाढवण्यासाठी एकीकडे त्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त गुप्त ठेवत चाहत्यांना झलक दाखवली जाईल. म्हणूनच सिनेमातली दोन प्रेक्षणीय गाणी जानेवारीमध्ये ट्रेलर येण्यापूर्वीच प्रदर्शित केली जाणार आहेत. सिद्धार्थ आनंद म्हणाले, ‘पठाणमध्ये दोन जबरदस्त गाणी आहेत. ही दोन्ही गाणी इतकी जबरदस्त आहेत, की पुढच्या वर्षाच्या चार्टबस्टरमध्ये आघाडीवर राहतील. म्हणूनच सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच आम्ही प्रेक्षकांना त्यांचा आनंद द्यायचं ठरवलं आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘जगभरातील लोकांसाठी डिसेंबर हा पार्टी आणि सुट्टीचा काळ आहे. त्यामुळे आम्ही थिएट्रिकल ट्रेलर प्रदर्शित करण्याआधीच गाणी प्रदर्शित करत आहोत. हा पठाणची कथा सिनेमाच्या प्रदर्शनापर्यंत शक्य तितकी गुप्त राखण्याच्या आमच्या धोरणाचा एक भाग आहे. तेव्हा पठाणच्या संगीतावर ताल धरायला सज्ज व्हा!’

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.