ETV Bharat / state

जेव्हा प्रिया दत्त महिलांसोबत सेल्फी काढण्यात दंग होतात... - mumbai

प्रिया दत्त साकीनाका परिसरातील एलबीएस मार्गावरील कृष्णा नगर येथे प्रचारासाठी आल्या होत्या. महिलांचे प्रश्न, देशाचे भविष्य यावर त्यांना बोलताना बघून अनेक महिलांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.

महिलांसबोत सेल्फी काढताना प्रिया दत्त
author img

By

Published : Apr 13, 2019, 8:38 PM IST

Updated : Apr 13, 2019, 9:53 PM IST

मुंबई - प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नर्गिस आणि अभिनेते सुनील दत्त यांची कन्या आपल्या परिसरात येऊन आपल्यासोबत बोलतात, हे बघून महिला भारावल्या आहेत. त्यामुळे त्यांना सेल्फी काढण्याचा मोह वापरला नाही. महिलांनी सेल्फी काढण्यासाठी मोबाईल समोर करताच प्रिया दत्तही सेल्फी काढण्यात दंग झालेल्या पाहायला मिळाल्या.

महिलांसबोत सेल्फी काढताना प्रिया दत्त

प्रिया दत्त साकीनाका परिसरातील एलबीएस मार्गावरील कृष्णा नगर येथे प्रचारासाठी आल्या होत्या. महिलांचे प्रश्न, देशाचे भविष्य यावर त्यांना बोलताना बघून अनेक महिलांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. प्रिया दत्त यांनी या परिसरात दोन सभा घेतल्या. त्या सभेतही मोठ्या प्रमाणात महिलांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी मागील पाच वर्षात तुमचे प्रश्न सुटले का? असा सवाल केला. ५ वर्षात तुम्ही ज्यांना पाहिले त्यांची कामेही पाहिली. आता मी पुन्हा तुमच्याकडे आली असून माझ्या काळात केलेल्या कामांची तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही २९ एप्रिलला योग्य निर्णय घ्या आणि देशात खोटे बोलणाऱ्या सरकारला उखडून टाकण्यासाठी परिवर्तन करा, असे आवाहन यावेळी प्रिया दत्त यांनी केले. यावेळी दत्त यांचा अनेक स्थानिक महिला संघटनांनी सत्कार करत आम्ही आता हाताची निशाणी विसरणार नसल्याची ग्वाही दिली.

Intro:मतदारांचा मोह पाहून प्रिया दत्तची झाल्या सेल्फीत दंग

Body:महिला मतदारांचा मोह पाहून प्रिया दत्तची झाल्या सेल्फीत दंग

मुंबई ता. 11:

प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नर्गिस आणि अभिनेते सुनील दत्त यांच्या कन्या आपल्या परिसरात आल्या, आपल्याला त्या भेटतात, बोलतात, हे सर्व पाहून भारावून गेलेल्या महिलांनी आपल्यासोबत सेल्फी काढली जावी म्हणून मोबाईल समोर केला. आणि त्या महिलांनाचा उत्साह पाहून प्रिया दत्तही सेल्फीत दंग झाल्या.
ठिकाण होते साकीनाका परिसरात असलेल्या एलबीएस मार्गावरील कृष्णा नगरचे. सायंकाळी प्रचारासाठी प्रिया दत्त आपल्यात आल्या आणि आपल्या प्रश्नावर, देशाच्या भविष्यावर बोलत आहेत हे पाहून अनेक महिलांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. पाच वर्षांपूर्वी आम्ही चूक केली होती ती आता दुरुस्त करण्याची वेळ आली असल्याची भावना व्यक्त करत अनेक महिलांनी प्रिया दत्त याना गराडा घालत त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी पुढे आल्या, या महिलांचा उत्साह पाहून प्रिया दत्त यांनी त्यांच्या हातातील मोबाईल घेऊन आपणच सेल्फी काढण्यात दंग झाल्याचे चित्र साकीनाका परिसरात पहावयाला मिळाले.
दरम्यान, प्रिया दत्त यांनी या परिसरात दोन सभा घेतल्या.त्या सभेतही मोठया प्रमाणात महिलांनी हजेरी लावत त्यांच्या भाषणाला प्रतिसाद दिला. यावेळी त्यांनी मागील पाच वर्षात तुमचे प्रश्न सुटले का, असा सवाल केला. पाच वर्षात तुम्ही ज्यांना पाहिले त्यांची कामेही पाहिली. आता मी पुन्हा तुमच्याकडे आली असून माझ्या काळात केलेल्या कामांची तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही 29 तारखेला योग्य निर्णय घ्या आणि देशात खोटे बोलणारे सरकार उखडून टाकण्यासाठी परिवर्तन करा असे आवाहन यावेळी प्रिया दत्त यांनी केले. यावेळी दत्त यांचा अनेक स्थानिक महिला संघटनांनी सत्कार करत आम्ही आता हाताची निशाणी विसरणार नसल्याची ग्वाही दिली.

Conclusion:मतदारांचा मोह पाहून प्रिया दत्तची झाल्या सेल्फीत दंग
Last Updated : Apr 13, 2019, 9:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.