मुंबई- खासगी रुग्णालयाकडून कोरोनाबाधित रुग्णाची आर्थिक लूट केली जात आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई याठिकाणाहून अशा प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. याची दखल घेत सरकारने जीआर काढण्याची घोषणा केली. मात्र, जो जीआर काढला तो कोरोना रुगणांची थट्टा करणारा आहे, असे भाजप नेते किरीट सोमैया यांनी म्हटले आहे.
तसेच राज्य सरकारने 10 हजार इंजेक्शन आम्ही उपलब्ध करू असे सांगितले पण इंजेक्शनसाठी आणि औषधांसाठी लोकांना रांगा लावाव्या लागत आहेत. केईएम रुग्णालयात कोविड रुग्ण गायब, रुग्णांबरोबर मृतदेह, नर्सेस आणि वार्डबाॅयची कमतरता आहे. सुशांत सिंगच्या आत्महत्येची चौकशी होते, मग सामान्य रुग्णांच्या आत्महत्या प्रकरणावर कर्मचारी व अधिकारी यांचावर त्वरित कारवाई व्ह्यायला हवी, अशी मागणी देखील सोमैया यांनी सांगितले.
हेही वाचा- रासायनिक खतांचा असाही दुष्परिणाम; ओडिशाच्या बरगढमध्ये आहेत सर्वाधिक कर्करोग रुग्ण...