ETV Bharat / state

...म्हणून डॉक्टरांनी केले खासगी दवाखाने बंद; रुग्णांचे होतायेत हाल - कोरोना व्हायरस बातमी

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका मुंबईतील स्लम परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना बसत आहे. मुंबईतील सायन कोळीवाडा, अँटॉप हिल, सारख्या परिसरात खासगी दवाखाने बंद असल्याने रुग्णांची मोठी तारांबळ होत आहे. राज्य सरकारने खासगी दवाखाने सुरू ठेवण्याचे सांगून सुद्धा डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत.

private-clinics-closed-by-doctors-due-to-ppe-kit-mumbai

author img

By

Published : Apr 6, 2020, 4:40 PM IST

मुंबई- देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत याचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र, मुंबईतील खाजगी दवाखाने मोठ्या संख्येने बंद असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. नर्सिंग होम जरी सुरू असले तरी या ठिकाणी डॉक्टर केवळ फोनवर उपलब्ध असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा- COVID-19 : भारताने गाठला चार हजार रुग्णांचा टप्पा; बळींची संख्याही शंभरहून अधिक..

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका मुंबईतील स्लम परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना बसत आहे. मुंबईतील सायन कोळीवाडा, अँटॉप हिल, सारख्या परिसरात खासगी दवाखाने बंद असल्याने रुग्णांची मोठी तारांबळ होत आहे. राज्य सरकारने खासगी दवाखाने सुरू ठेवण्याचे सांगून सुद्धा डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत. काही ठिकाणी दवाखाने बंद जरी असले तरी एक, दोन नर्सिंग होम सुरू आहेत. मात्र, या नर्सिंग होममध्ये फक्त कर्मचारी उपलब्ध असून येणाऱ्या रुग्णांची समस्या फोन वर डॉक्टरांना सांगून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

...म्हणून डॉक्टरांनी केले खासगी दवाखाने बंद
सायन परीसरातील डॉ.अशोक मिश्रा हे गेली अनेक वर्षे स्वतःचे खासगी नर्सिंग होम चालवत आहेत. परिसरातील खासगी दवाखाने का बंद आहेत याच कारण ते सांगतात की, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांना जे संरक्षण किट दिले जाते ते खासगी डॉक्टरांना मिळत नसून त्याचा तुटवडा जाणवत आहे. प्रशासनाकडून ह्याचा पुरवठा होत नसल्याने खासगी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. वातावरणातील सतत होणाऱ्या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला सारखी व्हायरल लक्षण असलेले रुग्ण सध्या अधिक आहेत. यात लहान मुलांचा समावेश खूप आहे. मात्र, खासगी क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरांना संरक्षण किट प्रशासनाकडून उपलब्ध झाल्यास दवाखाने सुरू होतील असेही सांगितले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.