ETV Bharat / state

राज्यात आता खाजगी बसेसला 100 टक्के क्षमतेने प्रवासाची परवानगी - private buses rules maharastra

सरकारने राज्यातील खाजगी प्रवासी बसेसना पूर्ण क्षमतेने म्हणजेच 100 टक्के प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी याबाबतचे परिपत्रक गृह विभागाने शुक्रवारी जारी केले आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 7, 2020, 4:36 AM IST

मुंबई - राज्यात 'मिशन बिगीन' अगेन अंतर्गत टप्याटप्याने सिनेमागृह, जिम, उद्याने आदी वरील निर्बंध उठवण्यात आल्यानंतर सरकारने आता राज्यातील खाजगी प्रवासी बसेसना पूर्ण क्षमतेने म्हणजेच 100 टक्के प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी याबाबतचे परिपत्रक गृह विभागाने शुक्रवारी जारी केले आहे.

नियमांचे पालन करत वाहतुकीस परवानगी -

कोरोनाचा प्रसार आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर राज्यात खाजगी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही प्रमाणात निर्बंध शिथील करत प्रवासास परवानगी देण्यात आली होती. सुरुवातीला खाजगी वाहतूक करताना 30 टक्के प्रवासी क्षमतेने परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर त्यात बदल करून ५० टक्क्यांपर्यंत मर्यादा वाढवण्यात आली होती. मात्र, आता पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामधे सर्व प्रकारच्या खाजगी, कंत्राटी वाहनांचा समावेश आहे. अशा प्रकारे परवानगी देताना नियमांचे पालन करावे लागणार आहे. खबरदारी म्हणून काही उपाययोजना करण्यात येणार आहेत.

बस चालकांना परिवहन विभागाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सुचनांचे पालन करावे लागणार आहे. एका फेरीनंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. बसचे आरक्षण, नियंत्रण कक्ष, कर्मचारी, कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक करण्यात आले आहे. त्याची वेळोवेळी तपासणीही अनिवार्य करण्यात आली आहे.

मास्क वापरणे बंधनकारक -

मास्क, सॅनिटायझर आदींचा वापर कर्मचाऱ्यांना अनिवार्य आहे. प्रवासादरम्यान नाष्टा, जेवण करतेवेळी तेथील ठिकाण,उपहारगृहे निर्जंतुकीकरण केलेली असावीत. याची खबरदारी वाहन चालकाने घेणे आवश्यक आहे. जे प्रवासी मास्क वापरणार नाहीत त्यांना प्रवास करता येणार नाही, असा नियम करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.