ETV Bharat / state

Mumbai Metro Line 2A and 7 : पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या मेट्रोत 10 लाखावर प्रवाश्यांचा प्रवास - मुंबईकरांनी मेट्रोने प्रवास केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईतील मेट्रो दोन अ आणि मेट्रो 7 या दोन्ही मार्गिकाचे लोकार्पण केले होते. उद्घाटन केल्यानंतर केवळ आठवड्याभरातच १० लाखाहून अधिक प्रवाशांनी मेट्रो मार्ग २अ आणि ७ ने प्रवास केला आहे. दोन्ही मेट्रो मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित झाल्या असून मेट्रो मार्ग १ सोबत जोडल्या गेल्या आहे. ज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात पहिले मेट्रो नेटवर्क तयार झाले आहे. या दोन्ही मेट्रो मार्गिका, मेट्रो १ च्या माध्यमातून रेल्वे मार्गाशी सहज जोडले गेल्याने लाखो मुंबईकरांना त्याचा लाभ झाला आहे.

10 lakh passengers traveled by metro
10 लाखा पेक्षा अधिक प्रवाश्यांनी मेट्रो प्रवास केला
author img

By

Published : Jan 28, 2023, 12:59 PM IST

मुंबई : २ एप्रिल २०२२ रोजी पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यापासून, मेट्रो २ अ आणि ७ ने आतापर्यंत जवळपास १ कोटींहून अधिक मुंबईकरांना अखंड सेवा देण्यात यश मिळवले आहे. आजपर्यंत जवळपास १,००,०३,२७० इतक्या प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर एकूण २२ ट्रेन दररोज २४५ मेट्रो सेवा पुरवत आहेत.

मुंबई १ कार्ड जारी : मुंबई 1 कार्ड हे तुम्हाला प्रवासादरम्यान आवश्यक असलेल्या सर्व गरजांसाठी एक सामान्य मोबिलिटी कार्ड आहे. मुंबई-१ कार्ड प्रवाशांना अखंडपणे प्रवास करण्यास मदत करत असल्याने हे कार्ड प्रवाशांसाठी अधिक सोयीचे होत आहे. हे कार्ड भारतातील सर्व महानगरांमध्ये आणि मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी वापरले जाऊ शकते. या कार्डचा वापर करून शॉपिंग सोबत मेट्रो, बेस्ट बसची तिकिटे इत्यादी खरेदी करू शकतात. मेट्रोच्या तिकीट खिडक्यांवर हे कार्ड उपलब्ध आहेत. मुंबई -1 कार्ड प्रत्येक सवलतीवर ५ ते १० टक्के सूट दिली जाते. सोमवार ते शनिवारी 5 टक्के, रविवारी १० टक्के आणि राष्ट्रीय सुट्ट्या असतील त्या दवशी प्रवास केल्यास १० टक्के सूट दिली जाते.

ॲप केले डाउनलोड : मुंबई १ कार्डप्रमाणेच ७५७३९ वापरकर्त्यांनी (६१७४२ Android आणि १३९९७ IOS) मुंबई-१ मोबाइल ऍप्लिकेशन त्यांच्या डिव्हाइसवर डाउनलोड केले. या ऍप्लिकेशनद्वारे प्रवासी त्यांच्या ठराविक अंतराच्या तिकिटांसाठी QR कोड तयार करू शकतात. हजारो लोकांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यामुळे आता त्यांना देशभरात प्रवास करण्यासाठी या कार्डचा उपयोग होऊ शकेल.अल्पावधीतच मेट्रो रेल्वे दोन अ आणि सात यांना पश्चिम उपनगरातून आणि मध्य रेल्वे मार्गावरील देखील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या सुट्ट्या असेल त्या दिवशी काही प्रमाणात सूट देखील दिली गेली आहे. जेणेकरून अधिक प्रवास प्रवासी करतील आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास या प्रकारे मदत होऊ शकेल.

अखंड प्रवासासाठी : आता मेट्रो हे केवळ वाहतुकीचे साधन राहिले नसून, ती एक नवी जीवनवहिनी बनत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्यानंतर आठवडाभरात १ दशलक्षाहून अधिक मुंबईकरांनी मेट्रोने प्रवास केला. तसेच मेट्रो कार्यान्वित झाल्यापासून आत्तापर्यंत १ कोटी प्रवासी टप्पा ओलांडण्यात आला आहे. लोक आता त्यांच्या वाहतुकीसाठी खाजगी वाहनांकडून पर्यावरणपूरक मेट्रोकडे वळत आहेत. असे महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Mumbai Metro Line 3 मेट्रो रेल्वे लाइन तीनचे बीकेसी स्थानकाचे काम प्रगतीपथावर अश्विनी भिडे यांनी केली पाहणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.