ETV Bharat / state

एमआयएमसोबत आमची युती कायम - अॅड. प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची युती कायम राहाणार असल्याचे बाळासाहेब उर्फ अॅड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. आंबेडकरांनी काँग्रेससोबत जाणार नसल्याचेही सांगितले.

अॅड. प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Sep 9, 2019, 3:41 PM IST

मुंबई - वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची युती कायम राहाणार असल्याचे बाळासाहेब उर्फ अॅड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. आंबेडकरांनी काँग्रेससोबत जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.

बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर

अॅड आंबेडकर म्हणाले, एमआयएमचे सर्वेसर्वा असदोद्दीन ओवेसी यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे. आम्ही एकमेकांना मतदार संघनिहाय इच्छूक उमेदवारांची यादी दिली आहे. त्यामुळे आमची युती कायम असून ती शेवटपर्यंत टिकावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांचा नामोल्लेख टाळून आंबेडकर म्हणाले, बाकी कोणाकडे आम्ही लक्ष देत नाही.

काही दिवसांपूर्वी वंचित आणि एमआयएम आघाडीचे राज्यातील एकमेव खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बैठक घेऊन जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्यामुळे एमआयएम आघाडीतून बाहेर पडत असल्याचे पत्रक प्रसिद्ध केले होते. या पत्रकात म्हटल्यानुसार वंचित आघाडीने एमआयएमला विधानसभेच्या आठ जागांचा दिलेला प्रस्ताव मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. वंचित आणि एमआयएम यांच्यातील या धुसफुसीनंतर आंबेडकर काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा समोर आली होती. मात्र आंबेडकरांनी काँग्रेससोबत जाण्याची इच्छा नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

विधानसभेला किती जागा लढविणार याबाबत विचारले असता ते म्हणाले, सध्या आम्ही जागांबाबत काहीच बोलणार नाही.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.