मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी जाहीर केलेल्या 2200 गाड्यांपैकी 2006 जादा बसगाड्यांचे आरक्षण झाले आहे. यापैकी 1155 बसगाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे.
गणोशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटीच्या गाड्या हाऊसफुल - आरक्षणाची ऑनलाइन सुविधा
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी प्रथमच एसटीने जाण्या-येण्याचे आरक्षण एकाचवेळी उपलब्ध करून दिले आहे. स्थानक आणि आगारांतील तिकीट खिडक्यांसह आरक्षणाची ऑनलाइन सुविधाही उपलब्ध आहे.
गणोशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटीच्या गाड्या हाऊसफुल
मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी जाहीर केलेल्या 2200 गाड्यांपैकी 2006 जादा बसगाड्यांचे आरक्षण झाले आहे. यापैकी 1155 बसगाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे.
Intro:मुंबई - गणेशोत्सवासाठी एसटीने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी जाहीर केलेल्या 2200 गाड्यांपैकी 2006 जादा बसगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. यात 1155 बसगाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे. Body:मुंबई उपनगरातून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी एसटीने यंदा नियमित गाड्यांव्यतिरिक्त 2200 जादा गाड्यांची सोय केली होती. या गाड्यांचे आरक्षण 27 जुलैपासून (26 जुलैच्या मध्यरात्रीपासून) सुरू करण्यात आले होते. मुंबई प्रदेशातील 900 गाड्याआरक्षित झाल्या असून यात 600 गाड्या ग्रुप बुकिंग करण्यात आल्या आहेत. संपूर्ण आरक्षण झालेल्या 34 आणि अंशतः आरक्षण झालेल्या 290 गाड्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी तब्बल 1933 गाड्यांचे सांघिक आरक्षण झाले होते. Conclusion:यंदा प्रथमच एसटीने प्रवाशांना जाण्या-येण्याचे आरक्षण एकाचवेळी उपलब्ध करून दिले आहे. स्थानक आणि आगारांतील तिकीट खिडक्यांसह आरक्षणाची ऑनलाइन सुविधाही उपलब्ध आहे.