मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधत येत्या एक-दोन दिवसात लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा दिला होता. याला वंचित बहुजन आघाडीने विरोध केला आहे. लॉकडाऊनने कोरोना आटोक्यात येणार नाही. शिस्त पाळणे, फिजिकल अंतर ठेवणे आवश्यक आहे. सरकारला विनंती आहे की लॉकडाऊन करू नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
लॉकडाऊन पुन्हा लावण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी यांनी दिला आहे. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होतात. याने सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांच्या पोटावर पाय येईल. लॉकडाऊनने कोरोना आटोक्यात येणार नाही, शिस्त पाळणे, फिजिकल अंतर पाळणे गरजेचे आहे. सरकारला आमची विनंती आहे की, लॉकडाऊन करू नये असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील करोना परिस्थितीची जाणीव करून मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना करोना नियमावलीबाबत स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन केले. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर पडणाऱ्या ताणाबद्दल कल्पना देत परिस्थिती कायम राहिली, तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
इतर पक्षांचाही लॉकडाऊनला विरोध -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर शब्दांचा हल्ला चढवला आहे. ‘विरोधक गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा देत आहेत. मी म्हणतो त्यांनी आता रस्त्यावर जरुर उतरावं. पण कोरोना विरुद्ध लढाई लढण्यासाठी’, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय. होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत. आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची”, असं ट्वीट करत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला हाणलाय. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री ‘मातोश्री’ किंवा ‘वर्षा’ बंगल्यावरुनच अधिकाऱ्यांना सूचना आणि आदेश देत होते. त्यावेळीही विरोधक मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करत होते. आता पुन्हा एकदा फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
हेही वाचा - "गेल्या वर्षभरापासून आम्ही बाहेर रस्त्यावरच आहोत" फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला