ETV Bharat / state

मुंबई : मुलुंडच्या झिरकोन हाऊसिंग सोसायटीमध्ये 62 लाखाची वीजचोरी - मुलुंडच्या झिरकोन हाऊसिंग सोसायटीमध्ये 62 लाखाची वीजचोरी

झिरकोन को.ऑप. हाऊसिंग सोसायटीतमध्ये महावितरणच्या तपासणी दरम्यान 63.23 लाखांची वीजचोरी उघडकीस आली आहे. याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात विद्युत कायदा 2003 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mulund Zircon Housing Society news
मुंबई : मुलुंडच्या झिरकोन हाऊसिंग सोसायटीमध्ये 63 लाखाची वीजचोरी
author img

By

Published : Jun 7, 2021, 5:02 PM IST

मुंबई - मुलुंडमधील निर्मल लाईफ स्टाईलच्या झिरकोन को.ऑप. हाऊसिंग सोसायटीतमध्ये महावितरणच्या तपासणी दरम्यान 1,76,100 युनिटची तब्बल 62 लाखांची वीजचोरी उघडकीस आली आहे. याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात विद्युत कायदा 2003 अंतर्गत झिरकोन को.ऑप. हाऊसिंग सोसायटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिपोर्ट

वीजचोरांचे धाबे दणाणले -

महावितरणचे अधिकारी आपल्या नियमित चेकिंगसाठी मुलुंड पश्चिम येथील निर्मल लाईफ स्टाईलच्या झिरकोन को. ऑप. हाऊसिंग सोसायटीत गेले असता वीजचोरी होत असल्याचा संशय महावितरणच्या अधिकाऱ्यांना आला. तेथील सखोल चौकशी केल्यानंतर या 39 मजली इमारतीच्या बांधकामासाठी लागतच्या बीएमसीच्या आऊट-गोइंग स्विचला, दुसरी विनामीटर केबल जोडून 2 वर्षांपासून वीजचोरी करीत असल्याचे आढळून आले. या प्रकरणात महावितरणने मुलुंड पोलीस ठाण्यात विद्युत कायदा 2003 अन्वये कलम 135 नुसार निर्मल लाईफ स्टाईल व झिरकोन को.ऑप. हाऊसिंग सोसायटीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत पुढील चौकशी करत आहे. महावितरणने, झिरकोन को.ऑप. हाऊसिंग सोसायटीला दंडासोबत 63.23 लाखांची रक्कम भरण्यास सांगितले होते. ही रक्कम न भरल्यामुळे त्यांच्यावर 4 जूनरोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना समोर आल्यामुळे, वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा - अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून, कोरोनाने मृत्यू झाल्याचा बनाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.