ETV Bharat / state

अखेर 'महापोर्टल'ला स्थगिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्याचबरोबर त्रुटी दूर करून ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

Postponement of mahapariksha portal
अखेर 'महापोर्टल'ला स्थगिती
author img

By

Published : Dec 7, 2019, 10:37 PM IST

मुंबई - सत्तेतील सहयोगी पक्षाकडून एका मागोमाग होणाऱ्या मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मान्य करत आहेत. आता 'महापोर्टल'ला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात शासकीय विभागाच्या परीक्षा या पोर्टलद्वारे होत होत्या. मात्र, या पोर्टलच्या अचुकतेविषयी अनेक परिक्षार्थींनी शंका उपस्थित केल्या होत्या. तसेच अनेक जिल्ह्यात या पोर्टलला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी आंदोलनही करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत महापोर्टलवर बंदी घालण्याची मागणी केली होती. दरम्यान, आरेच्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर आरेच्या आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. ही मागणीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी मान्य केली होती.

हेही वाचा - VIDEO : अन् 'तिने' शिकवला छेड काढणाऱ्यास चांगलाच धडा

महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्याचबरोबर त्रुटी दूर करून ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

हेही वाचा - प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून, सुटकेसमध्ये आढळले होते अवयव

महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने अनेक निवेदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता यावेळी उपस्थित होते.

Intro:अखेर महापरीक्षा पोर्टलला स्थगिती, त्रुटी दूर झाल्या शिवाय परीक्षा नाहीत - मुख्यमंत्री

मुंबई 7

सत्तेतील सहयोगी पक्षाकडून एका मागोमाग होणाऱ्या मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मान्य करत असून आता महापोर्टलला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात शासकीय विभागाच्या परीक्षा या पोर्टल वर होत होत्या. मात्र या पोर्टलच्या अचुकतेविषयी अनेक परिक्षार्थीनी शंका उपस्तिथ केल्या होत्या . तसेच अनेक जिल्ह्यात या पोर्टलला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी आंदोलनही करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत महापोर्टल वर बंदी घालण्याची मागणी केली होती. दरम्यान आरेच्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्या नंतर आरे च्या आंदोलन कर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. ही मागणी ही मुख्यमंत्री ठाकरे यांनी मान्य केली होती.

महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षापद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्याचबरोबर त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने अनेक निवदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता यावेळी उपस्तिथ होते.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षापद्धतीबाबतच्या तक्रारी, समस्यांबाबत तक्रारधारकांसोबत आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर या पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. Body:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.