ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा तुर्तास पुढे; 15 जुननंतर पुढील निर्णय - medical exam date corona effect

दरवर्षी, 15 मेपासून वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेला सुरूवात होते. मात्र, मागील महिन्याभरापासून राज्यावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. सध्या निवासी परीक्षा पात्र डॉक्टर कोविड-19 कक्षात कार्यरत आहेत. जीवाची बाजी लावत ते कोरोनाशी लढा देत आहेत. तर कोरोनाचा कहर कधी संपणार याचे उत्तर कुणाकडेही नाही. त्यामुळे या डॉक्टरांना पुढील काही महिने रुग्णसेवा करावी लागणार आहे. अशावेळी परीक्षेचे काय असा मोठा प्रश्न होता. त्यानुसार काही दिवसापूर्वीच 15 मे 2020 ची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूढे ढकलत जून 2020 मध्ये घेण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते.

वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा तुर्तास पुढे

author img

By

Published : Apr 23, 2020, 8:12 PM IST

मुंबई - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसंदर्भातील पुढील निर्णय 15 जूननंतर घेतला जाणार आहे.

दरवर्षी, 15 मेपासून वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेला सुरूवात होते. मात्र, मागील महिन्याभरापासून राज्यावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. सध्या निवासी परीक्षा पात्र डॉक्टर कोविड-19 कक्षात कार्यरत आहेत. जीवाची बाजी लावत ते कोरोनाशी लढा देत आहेत. तर कोरोनाचा कहर कधी संपणार याचे उत्तर कुणाकडेही नाही. त्यामुळे या डॉक्टरांना पुढील काही महिने रुग्णसेवा करावी लागणार आहे. अशावेळी परीक्षेचे काय असा मोठा प्रश्न होता. त्यानुसार काही दिवसापूर्वीच 15 मे 2020 ची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूढे ढकलत जून 2020 मध्ये घेण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते.

हेही वाचा - 9 महिन्याच्या बाळाचे कोरोनाशी दोन हात; सहा दिवसांच्या उपचारानंतर ठणठणीत

मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जून 2020 मध्ये परीक्षा होऊ शकतात का? यावर आज (गुरूवारी) विद्यापीठाचे कुलगुरू आणि महाराष्ट्र निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल वाघ तसेच पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत 15 जूनला परीक्षा घेणे शक्य नसल्यावर एकमत झाले. त्यामुळे तूर्तास परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे, डॉ वाघ यांनी सांगितले. परीक्षा रद्द होणार नसून त्या कधी घ्यायच्या याचा निर्णय 15 जुननंतर आढावा घेत घेतला जाणार आहे. डॉक्टरांना अभ्यास करण्यासाठी किमान 40-45 दिवस मिळतील याचा विचार करतच तारखा ठरवल्या जातील, असे आश्वासन कुलगुरू यांनी दिल्याचेही डॉ. वाघ यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.