ETV Bharat / state

मुंबईत आणखी पाणी कपात लागू केली जाईल - रवी राजा - रवी राजा

स्थायी समितीच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पत्राकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, गेल्या वर्षी पाऊस कमी पडला. केंद्रात आणि राज्यात बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी पुढील दहा वर्षाचा विचार करून नवीन धरण बांधण्याची गरज होती.

मुंबईत आणखी पाणी कपात लागू केली जाईल - रवी राजा
author img

By

Published : May 3, 2019, 11:16 PM IST

Updated : May 3, 2019, 11:23 PM IST

मुंबई - मुंबईत कमी पाऊस पडल्याने पालिकेने १० टक्के पाणी कपात लागू केली असली तरी ५० टक्के पाणी कपात सुरु आहे. . मुंबईकरांना पाणी देण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरले असून मुंबईत येत्या काही दिवसांत आणखी पाणी कपात लागू केली जाण्याची शक्यता पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत आणखी पाणी कपात लागू केली जाईल - रवी राजा

स्थायी समितीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाणी कपातीचा मुद्दा लावून धरला. यावर उत्तर देताना गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा असला तरी मुंबईकरांना येत्या जुलैपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने नियोजन केले असल्याची माहिती मुख्य जल अभियंता अशोककुमार तवाडीया यांनी स्थायी समितीत दिली. यावर्षी पाणीसाठा कमी असला तरी राखीव कोट्यातील पाणी वापरण्यात येणार असल्यामुळे जादा पाणीकपात केली जाणार नाही, असे तवाडिया यांनी स्पष्ट केले.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा, अशा सात धरणांमधून रोज ३ हजार ८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. पावसाळा संपल्यानंतर १ ऑक्टोबरला आढावा घेतला जातो. यावेळी सातही तलावांत मिळून वर्षभरासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. यावर्षी १ ऑक्टोबरला तब्बल २ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी असल्याचे समोर आले. त्यामुळे यावर्षी मुंबईकरांना पुरेसे पाणी कसे मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पालिकेने राज्य सरकारडून भातसा आणि अप्पर वैतरणातील राखीव कोट्याचा वापर करण्याची परवानगी घेतली आहे. यानुसार जुलैपर्यंत मुंबईकरांना आवश्यक असणारा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीसाठा कमी असला तरी जुलैपर्यंत पाण्याची चिंता नसल्याचे जल अभियंता तवाडिया यांनी म्हटले आहे. उपलब्ध पाणीसाठ्यातून पावसाळ्यापर्यंत पुरेशा पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणी कपात सुरू करण्यात आली आहे, असे असले तरी मुंबईत आणखी पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी आजच्याच दिवशी ४ लाख २७ हजार ७७७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. यावर्षी आजच्या दिवशी २ लाख ४३ हजार ५१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा तलावांमध्ये आहे, असे तवाडिया यांनी सांगितले.

स्थायी समितीच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पत्राकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, गेल्या वर्षी पाऊस कमी पडला. केंद्रात आणि राज्यात बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी पुढील दहा वर्षाचा विचार करून नवीन धरण बांधण्याची गरज होती. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पाऊस कमी पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाने काय तयारी केली आहे? असा प्रश्न विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. महापालिका प्रशासनाने शहरात १० टक्के पाणी कपात लागू केली आहे. प्रशासन १० टक्के पाणी कपात बोलत आहे हे चुकीचे आहे. सत्ताधारी मुंबईकरांची दिशाभूल करीत आहेत. शहरात ५० टक्के पाणी कपात आहे. लोकांना कमी दाबाने पाणी येत आहे. जे पाणी येत होते त्यात बदल करून ही वेळ कमी करण्यात आली आहे, असे सर्व पसखीय नगरसेवक सांगत आहेत. सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाचे नगरसेवकही पाणी कपातीबाबत बोलत आहेत. सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. काही दिवसात पाणी कपातीत वाढ केली जाईल, अशी शक्यता रवी राजा यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारकडे पालिकेने पाण्याचा राखीव साठा वापरण्याची परवानगी मागितली आहे. याचा अर्थ पाण्याची गंभीर समस्या आहे. पालिका प्रशासन मुंबईकरांना स्वस्त आणि स्वच्छ पाणी देऊ शकत नाही, असा आरोप रवी राजा यांनी केला आहे.

तलावांमधील पाणीसाठा - (दशलक्ष लिटरमध्ये)

  • तलावाचे नाव २०१९ २०१८
  • अप्पर वैतरणा ९५९ ------
  • मोडक सागर ४४२७१ ६४३९४
  • तानसा २९३७४ ३५७९३
  • विहार ३४८१ ८८१६
  • भातसा ११८८३२ १७८९७६
  • तुळशी २८७८ ३०५५
  • मध्य वैतरणा ४३२५६ १३६७४३

Intro:मुंबई -
मुंबईत कमी पाऊस पडल्याने पालिकेने १० टक्के पाणी कपात लागू केली असली तरी ५० टक्के पाणी कपात सुरु आहे. मुंबईकरांना पाणी देण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरले असून मुंबईत येत्या काही दिवसात आणखी पाणी कपात लागू केली जाईल अशी शक्यता विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान स्थायी समितीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाणी कपातीचा मुद्दा लावून धरला. यावर उत्तर देताना गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा असला तरी मुंबईकरांना येत्या जुलैपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने नियोजन केले असल्याची माहिती मुख्य जल अभियंता अशोककुमार तवाडीया यांनी स्थायी समितीत दिली. यावर्षी पाणीसाठा कमी असला तरी राखीव कोट्यातील पाणी वापरण्यात येणार असल्यामुळे जादा पाणीकपात केला जाणार नाही, असे तवाडिया यांनी स्पष्ट केले. Body:मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. पावसाळा संपल्यानंतर १ ऑक्टोबरला आढावा घेतला जातो. यावेळी सातही तलावांत मिळून वर्षभरासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. यावर्षी १ ऑक्टोबरला तब्बल २ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी असल्याचे समोर आले. त्यामुळे यावर्षी मुंबईकरांना पुरेसे पाणी कसे मिळणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पालिकेने राज्य सरकारडून भातसा आणि अप्पर वैतरणातील राखीव कोट्याचा वापर करण्याची परवानगी घेतली आहे. यानुसार जुलैपर्यंत मुंबईकरांना आवश्यक असणारा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीसाठा कमी असला तरी जुलैपर्यंत पाण्याची चिंता नसल्याचे जल अभियंता तवाडिया यांनी म्हटले आहे. उपलब्ध पाणीसाठ्यातून पावसाळ्यापर्यंत पुरेशा पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणी कपात सुरू करण्यात आली आहे, असे असले तरी मुंबईत आणखी पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी आजच्याच दिवशी ४ लाख २७ हजार ७७७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. यावर्षी आजच्या दिवशी २ लाख ४३ हजार ५१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा तलावांमध्ये आहे असे तवाडिया यांनी सांगितले.

स्थायी समितीच्या बैठकीनंतर विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पत्राकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, गेल्या वर्षी पाऊस कमी पडला. केंद्रात आणि राज्यात बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी पुढील दहा वर्षाचा विचार करून नवीन धरण बांधण्याची गरज होती. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पाऊस कमी पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाने काय तयारी केली आहे? असा प्रश्न विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. महापालिका प्रशासनाने शहरात १० टक्के पाणी कपात लागू केली आहे. प्रशासन १० टक्के पाणी कपात बोलत आहे हे चुकीचे आहे. सत्ताधारी मुंबईकरांची दिशाभूल करीत आहेत. शहरात ५० टक्के पाणी कपात आहे. लोकांना कमी दाबाने पाणी येत आहे. जे पाणी येत होते त्यात बदल करून ही वेळ कमी करण्यात आली आहे. असे सर्व पसखीय नगरसेवक सांगत आहेत. सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाचे नगरसेवकही पाणी कपातीबाबत बोलत आहेत. सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. दहा दिवसांनंतर पाणी कपात होणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही. काही दिवसात पाणी कपातीत वाढ केली जाईल अशी शक्यता रवी राजा यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारकडे पालिकेने पाण्याचा राखीव साठा वापरण्याची परवानगी मागाईतली आहे. याचा अर्थ पाण्याची गंभीर समस्या आहे. पालिका प्रशासन मुंबईकरांना स्वस्त आणि स्वच्छ पाणी देऊ शकत नाही असा आरोप रवी राजा यांनी केला आहे.

तलावांमधील पाणीसाठा - (दशलक्ष लिटरमध्ये)
तलावाचे नाव २०१९                   २०१८
अप्पर वैतरणा         ९५९                   ------
मोडक सागर         ४४२७१                  ६४३९४
तानसा                  २९३७४                  ३५७९३
विहार                  ३४८१                  ८८१६
भातसा                  ११८८३२                  १७८९७६
तुळशी                  २८७८                  ३०५५
मध्य वैतरणा         ४३२५६          १३६७४३Conclusion:
Last Updated : May 3, 2019, 11:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.