ETV Bharat / state

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; ऊर्जा खाते राऊतांकडून जाणार?

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर सोनिया गांधी सहित दिल्लीतील काही ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्री पद हे इतर कोणाकडे जाण्याची शक्यता आहे. ऊर्जा मंत्री पदासाठी मंत्री सुनील केदार यांच्या नावाची जोरदार चर्चा दिल्लीत आहे. त्यामुळे ऊर्जा खाते सुनील केदार यांच्याकडे दिल जाण्याची शक्यता आहे.

possibility of internal changes in Maharashtra congress
नितीन राऊत
author img

By

Published : Mar 19, 2021, 2:34 PM IST

मुंबई - ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे मंत्रीपद धोक्यात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर सोनिया गांधी सहित दिल्लीतील काही ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्री पद हे इतर कोणाकडे जाण्याची शक्यता आहे. आपल्याला ऊर्जामंत्री पद मिळावा म्हणून महाराष्ट्र प्रदेशाद्याक्ष नाना पटोले यांच्या कडून दिल्लीदरबारी गळ घातली जाते. पण नाना पटोले यांच्या सहित इतरही नावांची चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे. काल पासुन काँग्रेस नेते दिल्लीत तग धरून आहेत. तर ऊर्जा मंत्री हे गेल्या दोन दिवसापासून दिल्ली दरबारी तळ ठोकून होते. मात्र आज पुन्हा ते मुंबईत आले आहेत. ऊर्जा मंत्री पदासाठी मंत्री सुनील केदार यांच्या नावाची जोरदार चर्चा दिल्लीत आहे. त्यामुळे ऊर्जा खाते सुनील केदार यांच्याकडे दिल जाण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्ष पद नितीन राऊत यांना देण्याची शक्यता-

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद कोणाकडे जाणार यासाठी अनेक नावांची चर्चा होती. मात्र ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडून ऊर्जा खाते काढून घेतल्यानंतर त्यांचं महत्त्व कमी न करता, त्यांना विधानसभा अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. नितीन राऊत हे दिल्लीतील काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्याच्या मर्जीतले नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षाची जबाबदारी सोपवण्यात यावी अशा प्रकारचा चर्चाही दिल्ली दरबारी सुरू आहे.

दिल्लीत काँग्रेस नेत्यांची शरद पवारांसोबत भेट-

कालपासून महाराष्ट्रातील नेते दिल्लीला पोहचले आहेत. यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदाद हे नेते दिल्ली दरबारी पोहोचले आहेत. बाळासाहेब थोरात सह काही काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीत काँग्रेस मध्ये विधानसभा अध्यक्ष पद आणि काँग्रेसजवळ असलेल्या खात्यांचे खांदे पालट संदर्भात चर्चा असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा - मंत्रालयातील वीज पुरवठा सुरळीत; ७ मिनिटात पुरवठा पूर्वपदावर आणल्याचा बेस्टचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.